वयाच्या 19 वर्षी आयुष्मान खुराना सोबत नातेसंबंधात होती ताहिरा, वाढदिवसाला अभिनेत्याच्या अंगावर केक लावून होती चाटत !!

बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेता आयुष्मान खुराना आपला वाढदिवस 14 सप्टेंबर ला साजरा करतो. काल आयुष्मानने आपला 37 वा जन्मदिवस साजरा केला. या निमित्ताने आयुष्मानच्या चाहत्यांनी व जवळच्या मित्रांनी त्याला शुभेच्छा दिल्या, मात्र जिच्या शुभेच्छांची सर्वात जास्त चर्चा झाली होती. ती अभिनेत्याची पत्नी ताहिरा कश्यप आहे. ताहिरा कश्यपने विशेष अंदाजात पती आयुष्मान खुराना ला जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

ताहिराने सोशल मीडियावर आयुष्मान साठी खास पोस्ट लिहिली आणि फोटो शेयर करून शुभेच्छा दिल्या होत्या. एवढेच नाही तर ताहिराने आपल्या व आयुष्मानच्या पहिल्या मुलाखताची देखील आठवण काढली आहे. ताहिरा कश्यप सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय राहते. ती आयुष्मान खुराना सोबत नेहमी फोटोज पोस्ट करत राहते. ताहिराने आयुष्मानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपले जुने फोटोज शेयर केले होते.

फोटोमध्ये आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप खूपच तरुण दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करताना आयुष्मानच्या पत्नीने लिहिले आहे की, ‘आम्ही 19 वर्षांचे होतो! मी तुम्हाला फ्रेम, मोटरसायकल, एकसारखे स्वेटर आणि मफलर मध्ये खूपच कुल अंदाजात बघितल, माझे मन तेव्हा जिंकले जेव्हा तुम्ही गिटार पकडली आणि माझ्यासाठी गाणे गायले होते. तुम्ही कलेच्या प्रती खूपच निष्ठावान आहात. जी गोष्ट मला प्रेरित करते, ती ही आहे की एवढ्या वर्षानंतर देखील तुमचा निरागसपणा, काम आणि आयुष्याच्या प्रती उत्साह तसाच राहतो.’

ताहिरा कश्यपने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘तुम्ही माझे खूप मोठे विश्वासप्राप्त आहात. मी जास्त रॉमांटीक नाही होऊ शकत कारण नसमजदार (जसे की तुम्ही मला म्हणता) माझ्याकडून चांगली होऊन जाते, मात्र मला तुम्हाला सांगावे वाटते की आयुष्य तुमच्यासोबत अद्भुत आहे आणि मी तुमच्याकडून बरेच काही शिकते! वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ सोशल मीडियावर आयुष्मान खुरानासाठी लिहिल्या गेलेला ताहिरा कश्यपचा ही पोस्ट खूपच व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *