वर्षा उसगांवकर यांचे पती आहेत या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाचे पुत्र, पाहा त्यांचे फोटो

मराठीसह हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाने नव्वदचं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. त्यांनी आपला अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी विविध भूमिका गाजवल्या. मराठीत ‘गंमत- जंमत’, ‘हमाल दे धमाल’, ‘लपंडाव’, ‘भुताचा भाऊ’ यांसारख्या मराठी चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांना भावल्या.

इतकंच नाही तर मराठीतील या यशामुळे वर्षा उसगांवकर यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची दारं उघडली. मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या. ‘परवाने’, ‘तिरंगा’, ‘हस्ती’, ‘दूध का कर्ज’, ‘घर आया मेरा परदेसी’ अशा विविध चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी भूमिका साकारल्या.

एकेकाळी मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना केली जात असे. त्यांना आजही प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्याविषयी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते. छोट्या पडद्यावरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून वर्षा उसगांवकर रसिकांचे भरघोस मनोरंजन करत आहेत.

वर्षा उसगांवकर या प्रसिद्ध अभिनेत्री असल्या तरी त्या इतर अभिनेत्रीं प्रमाणे सोशल मीडियावर तितक्याशा सक्रिय नाहीत. त्यामुळे त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी खूपच कमी माहिती त्यांच्या चाहत्यांना आहे. आज आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत.

वर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केले असून वर्षा यांचे पती अनेकवेळा तिच्यासोबत फिल्मी समारंभात दिसतात. त्या दोघांच्या लग्नाला जवळजवळ २० वर्षं झाले आहेत. अजय यांचे कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहे तर वर्षा यांचे वडील प्रसिद्ध राजकारणी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *