‘तारक मेहता…’ मालिका सोडल्यानंतर काय काम करत आहे ‘अंजली भाभी’? तुम्ही देखील राहून जाताल थक्क बघून तिचे काम..

तारक मेहता का उल्टा चष्मा मागील 13 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. एकदा जर कोणी कलाकार या मालिकेशी जोडल्या जातो तर तो नेहमीसाठी लोकप्रिय होऊन जातो. काहीसे असेच दिशा वकानी आणि निधी भानुशाली सोबत झाले आहे. मात्र मालिकेतील एक कलाकार आणखी एक आहे जी खूपच लोकप्रिय होती आणि तिने मालिका सोडली आहे. आम्ही बोलत आहोत नेहा मेहता म्हणजेच अंजली तारक मेहता बद्दल. चला तर मग जाणून घेऊया की आजकाल नेहा नेमकं करत काय आहे.

मागच्या वर्षी नेहाने मालिकेच्या निर्मात्यांसोबत आपल्या काही अडचणी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकवेळा प्रयत्न करूनही तिला काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही. तर या सर्व गोष्टींमुळे तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. नंतर तिने परत येण्याची देखील आपली इच्छा व्यक्त केली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता कारण सुनैना फौजदार ला अगोदरच या भूमिकेसाठी निवडले गेले होते.

आता तारक मेहता का उल्टा चष्मा सोडल्यापासून नेहा मेहता पूर्णपणे गायब आहे. तिने दुसरी कोणतीच मालिका साइन केली नाही आहे आणि चाहते हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की नेमकं आजकाल ती करत काय आहे. नेहाची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट बघून असे समजत आहे की ती हल्लीच एका म्युसिक व्हिडियो च्या चित्रीकरणात व्यस्थ होती. गाणे आध्यात्मिक रुपात होते आणि अभिनेत्रीने आपल्या प्रशंसकांना याबद्दल माहिती देखील दिली होती.

या व्यतिरिक्त, नेहा मेहता काही दिवसांअगोदर आपल्या घरी गणेश उत्सवात व्यस्थ होती. तिने चाहत्यांना याबद्दल सांगताना पोस्ट केले की, ‘मी धन्य आहे की मला असे कुटुंब मिळाले आहे जे सार्वभौमिक शक्तीशी जोडलेले आहे.’ तसे तर मालिकेत नवीन अंजली आली आहे. मात्र चाहते अजून देखील तारक मेहता सोबत तिच्या केमिस्ट्रीला मिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *