सोनू सूद चालवत होता ट्रॅक्टर, अचानक फराह म्हणाली- ‘ बसव मला तुझ्या….!’ हे बघून नेहा कक्कड ने केली अशी टिप्पणी

सोशल मीडिया ही एक अशी जागा आहे जिथे नेहमी बॉलीवूड कलाकार आणि त्यांचे कृत्ये चर्चेत राहतात. तसे तर सोनू सूदच्या कृत्यांपासून तुम्ही चांगल्यापैकी परिचित असाल. सोनूला गरिबांचा पालनकर्ता देखील म्हणले जाते. मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये सोनूने अनेक गरजू लोकांना मदत केली होती. सोनूने आजदेखील आपली मदत तशीच चालू ठेवली आहे. सोनू सूद जमिनीशी जोडलेले आहेत. त्याला चारचाकी व दुचाकी गाडीबरोबरच ट्रॅक्टर चालवायला देखील खूप आवडते.

या दिवसात सोनू सूदचा ट्रॅक्टर चालवतानाचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे. सोनू शेतीच्यामध्ये चांगल्या वातावरणात ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद घेत आहे. या फोटोमध्ये खास गोष्ट ही आहे की सोनू सोबत ट्रॅक्टरवर बॉलीवुड मधील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका व चित्रपट दिग्दर्शिका फराह खान देखील बसलेली आहे. भारी फराह खान या सोनू सुद सोबत चिटकून बसली आहे. यादरम्यान फराहने डोळ्यावर काळा चष्मा लावला आहे आणि हिरव्या रंगाची कुर्ती घातली आहे.

फराह खान व सोनू सूद यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. फराह ने स्वतः या फोटोला आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून शेयर केला आहे. या फोटोला शेयर करताना फराह लिहिते की, ‘ सर्वकाही पंजाबी आहे… चंदीगड, ट्रॅक्टर आणि सोनू सुद. माझ्या मित्रा तुझ्यासोबत काम करताना प्रत्येकवेळी मजा येते.’ याच बरोबर फराह ने ‘देसी म्युसिक फॅक्टरी’ नावाच्या एका म्युसिक लेबलला देखील टॅग केले आहे. यावरून हा अंदाज लावता येऊ शकतो की हा फोटो कदाचित एखाद्या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान घेतला असेल.

ट्रॅक्टरवर बसलेले सोनू सूद आणि फराह खान यांचा फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. या फोटोला आतापर्यंत 44 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. या फोटोवर लोक मनोरंजक टिप्पणी देखील करत आहेत. फक्त सामान्य जनताच नाही तर बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कडने देखील सोनू सुद व फराह खान यांच्या या फोटोखाली टिप्पणी केली आहे. गायिकेने टिप्पणीमध्ये ‘हो.’ म्हणून लिहिले आहे. म्हणजेच नेहा देखील फराहच्या या गोष्टीवर आपली सहमती दर्शवत आहे की सोनू सुद सोबत काम करायला खूप मजा येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *