Sacred games मधील अभिनेत्रीने सांगितला आपला कास्टिंग काउच चा अनुभव, म्हणाली – ‘ ते माझ्या मांड्या आणि क्लीवेज… ‘

‘ सेक्रेड गेम्स ‘ सारख्या वेबसिरीज चा भाग राहिलेली अभिनेत्री सुरवीन चावला यांनी बॉलिवूडसृष्टीचा काळा चेहरा पुन्हा एकदा सर्वांसमोर आणला आहे. सुरवीन ने आपल्या कास्टिंग काउचबद्दल काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांना ऐकून पुन्हा एकदा बॉलिवूडचे ग्लॅमरस दिसणारे जग खूपच विचित्र दिसत आहे. हे काही पहिल्यांदाच घडले नाही आहे की अभिनेत्रीने आपला अनुभव सांगितला आहे.

तसेच मागच्या काही वर्षात अनेक मोठ्या अभिनेत्री जसे की कंगना रनौत, राधिका आपटे, टिस्का चोपडा इत्यादींनी मान्य केले आहे की चित्रपटसृष्टीत कास्टिंग काउच आहे आणि त्यांनी आपले अनुभव सांगितले. दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता यांनी हल्लीच आपले पुस्तक ‘ सच कहु तो ‘ चे विमोचन केले आहे, यादरम्यान त्यांनी असे अनेक खुलासे केले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा त्या सर्व गोष्टी समोर आल्या आहेत जे नीना यांच्या आरोपावर सत्याची मोहर लावतात.

सन 2019 मध्ये पिंकविला सोबतच्या एका मुलाखतीत, ‘ सेक्रेड गेम्स ‘ अभिनेत्री सुरवीन चावला ने कास्टिंग काउचबद्दल सांगताना म्हणले होते की, ‘ मला तीन वेळेस कास्टिंग काउच चा सामना करावा लागला होता. एक वेळ होती जेव्हा मला चित्रपट निर्मात्यासोबत जाण्यासाठी सांगितले होते. एका भूमिकेसाठी दिग्दर्शक मला म्हणाले होते की, ‘ मला तुमच्या शरीरातील अंगाचे प्रत्येक इंच जाणून घ्यायचे आहे. मी तेव्हापासून अशा लोकांकडे लक्ष देणे सोडून दिले. ‘

हिंदी चित्रपट सृष्टीतील कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, ‘ हे अगदी हल्लीच घडले, मागच्या वर्षाच्या मागच्या वर्षी. मला एका कार्यालयातून बाहेर पडावे लागले कारण कोणीतरी मला हे करण्यासाठी प्रवृत्त केले. सुरवीन म्हणाल्या की, ‘ एक चित्रपट निर्माता हे बघणार होता की माझी क्लीवेज कशी दिसते आणि त्यांना हे देखील बघायचे होते की माझ्या मांड्या कशा दिसतात. खरच अशा प्रकारच्या गोष्टी असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *