मराठी अभिनेता सचिन पिळगावकर ला ‘शोले’ या चित्रपटात काम केल्याबद्दल मानधन न देता दिली होती चक्क ही गोष्ट

आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर एक वेगळी छाप उमटवणारे अभिनेते, दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक म्हणजे सचिन पिळगावकर. आज १७ ऑगस्ट रोजी सचिन पिळगावकर यांचा वाढदिवस आहे.

सचिन यांचा जन्म १९५७ मध्ये मुंबईत झाला. त्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये आणि काही टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करत अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केलं.

सचिन यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रविंद्र नाथ टागोर यांच्या नाटकावर आधारित ‘डाकघर’ या हिंदी चित्रपटात काम केले. त्यानंतर १९८२मध्ये त्यांनी ‘नदियाँ के पार’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटातून सचिन खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले.

सचिन यांनी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपट ‘शोले’मध्ये भूमिका साकारली. या चित्रपटात अहमदची भूमिका साकारण्यासाठी त्यांना मिळालेलं मानधन जाणून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. या भूमिकेसाठी सचिन पिळगावकर यांना मानधन म्हणून फ्रीज देण्यात आला होता.

२००६मध्ये त्यांनी ‘तू तोता मैं मैना’मध्ये या मालिकेत काम केले. ही मालिका त्यावेळी सर्वात लोकप्रिय ठरली होती. ‘मायबाप’ या चित्रपटातून सचिन यांनी दिग्दर्शनाच्या दुनियेत पदार्पण केले.

सचिन यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये २०हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. सचिन यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *