BREAKING NEWS: तारक मेहताच्या चाहत्यांवर कोसला दुःखचा डोंगर,तारक मेहता मधील नट्टू यांचे क’र्करो’गाने निधन!!

तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील सर्वांचे लाडके नट्टू काका अर्थात अभिनेते घनश्याम नायक यांचं आज निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. निर्माते असित कुमार मोदी यांनी घनश्याम नायक यांचं नि’धन झाल्याचं सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून घनश्याम नायक यांची क’र्करो’गाशी झुं’ज सुरू होती, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. घनश्याम यांच्यावर काही महिन्यांपूर्वी एक श”स्त्रक्रि’या झाली होती.

‘तारक मेहता…’मधील नट्टू काका ही त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती.नट्टू काका म्हणजेच अभिनेते घनश्याम नायक यांना गेल्यावर्षी कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याने गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी या शोमधून ब्रेक घेतला होता. मात्र कदाचित तुम्हाला कल्पना नसेल पण प्रेक्षकांना भरभरून हसवणाऱ्या घनश्याम यांना एकेकाळी पैसे कमावण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता.

चाहत्याचं खळखळून मनोरंजन करणाऱ्या नट्टू काकांचं निधन झाल्यानं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी दशकापेक्षा अधिक काळ चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतून ते घराघरातील प्रत्येक व्यक्तीला माहिती झाले. त्यांचं गुजराती रंगभूमीसाठीचं मोठं योगदान राहिलं आहे. त्यांनी अनेक गुजराती नाटकात काम केलं आहे.

ही होती शेवटची इच्छा
काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका मुलाखतीत शेवटची इच्छा बोलून दाखवली होती. ‘मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं आहे आणि चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा आहे. माझी ही इच्छा देवाने पूर्ण केली पाहिजे’, असं ते भावूक होऊन म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *