नर्गिस फाखरीने केला मोठा खुलासा, म्हणाली-‘मला रणबीर आणि उदय सोबत एकत्र…’

नर्गिस फाखरी महामारीच्या दरम्यान अमेरिकेत रहात आहे आणि जेव्हापण तिला बॉलीवूडची आठवण येते ती जुने मित्र-मैत्रिणी इलियाना डीक्रुज, हुमा कुरेशी आणि वरून धवन यांच्यासोबत घालवलेली वेळ आठवून आनंदी होते. बॉलीवूड देखील नर्गिसला विसरू शकत नाही कारण तिचा बोल्डनेस खरच मन जिंकणारा होता. मात्र तुम्हाला माहित आहे का की नर्गिस अनेक काळापासून उदय चोपडा सोबत नातेसंबंधात आहे. आता तिने सांगितले आहे की या नात्याबद्दल तिला एक खंत आहे. तसेच रणबीर कपूर सोबत आपल्या अफेयर बद्दल देखील तिने चुप्पी तोडली आहे.

बॉलीवूड मध्ये आपले 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नर्गिसने म्हणले की हा एक अद्भुत प्रवास राहिला आहे. तिने आपला पहिला चित्रपट ‘रॉकस्टार’ बद्दल सांगितले आहे की ही एक मोठी गोष्ट आहे, मला एका चाचणीबद्दल मेल पाठवला गेला होता. मला खरच विश्वास आहे की हा माझ्या नशिबाचाच खेळ होता की ज्यामुळे मी इथे आली. मी भारतात कधी आली नव्हती आणि कधीच राहिली देखील नव्हती. मी जे ऐकल, त्या हिशोबाने इम्तियाजने माझी एक दागिन्यांच्या कॅम्पेन ची जाहिरात बघितली.

ई-टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या व उदय चोपडाच्या प्रेम संबंधाबद्दल सांगताना नर्गिस सांगते की, ‘उदय व मी आम्ही दोघांनी एकमेकांना 5 वर्षांपर्यंत डेट केले होते आणि भारतात मिळालेले सर्वात चांगले व्यक्ती होते. मी माध्यमांना असे काही सांगितले नाही कारण मला आमचे नाते गुपीत ठेवायचे होते, मात्र मला याची खंत आहे. कारण मी डोंगराच्या टोकावर जाऊन ओरडायला पाहिजे होत की मी एवढ्या सुंदर हृदयाच्या माणसावर प्रेम करते.

चित्रपट ‘रॉकस्टार’ दरम्यान रणबीर सिंह सोबत असलेल्या नात्याबद्दल देखील तिने खुलासा केला आहे की, ‘आता पर्यंत, मी कृतघ्न आहे की मी रणबीर सोबत सर्वात आधी सह-कलाकार म्हणून काम केले. तो एक शानदार अभिनेता आहे आणि त्याच्यासोबत काम करणे सोपे आहे. सोबतच त्याची आई देखील खूपच प्रेमळ आहे. त्यावेळेस आयुष्यात त्याचे माझ्या सोबत असणे हे खरच चांगले होते कारण तेव्हा भारतात मी एकटीच होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *