” मुलं जन्माला घालण्यासाठी लग्नाची नसते गरज, “
‘ या ‘ अभिनेत्रींनी या विधानाला करून दाखवले सत्य..!

बॉलिवूड मधील कलाकारांच्या आयुष्य त्यांच्या चित्रपटांसारखीच अनेक वळणांनी भरलेले राहते. त्यांच्या आयुष्यात कधी काय होऊन जाईल हे त्यांना देखील माहित नसते. कोणालाच माहित नसते की ते कधी काय निर्णय घेतील. बॉलिवूड मध्ये एक काळ असा देखील होता की आपल्या चित्रपट कारकिर्दीमुळे अभिनेत्री लग्नाबद्दल व मुलांबद्दल विचार देखील करू शकत नव्हत्या. जरी कोणाचे देखील झाले असेल त्या लपवून ठेवत असतात. मात्र आता वेळेबरोबरच या चित्रपट कलाकारांच्या आयुष्यात देखील खूप बदल येऊ लागला आहे.

आता नवीन अभिनेत्रींया आपल्या लग्नापासून ते गरोदर पणापर्यंत मनसोक्त बोलत आहेत. आई होण्याअगोदर सोशल मीडियावर आपला बेबी पंप दाखवत आहे. यामधील काही अभिनेत्रींया तर लग्नाअगोदरच आई होऊन जातात. चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नाअगोदरच आई झाल्या आहेत.

ईशा शरवानी
अभिनेत्री ईशा शरवानी हल्लीच्या काळात चित्रपटांपासून खूप दूर आहे. त्यांचा एक मुलगा आहे ज्याचे नाव त्यांनी लुका ठेवले आहे. ईशा शरवानी देखील एकटी आई ( सिंगल मदर ) आहे. त्या रोजच आपल्या मुलासोबत आपले फोटोज शेयर करतात. आता ईशा आधीपेक्षा खूप वेगळ्या दिसत आहेत.

एमी जॅक्सन
एमी जॅक्सन अनेक बॉलिवूडच्या व दक्षिणेकडील चित्रपटात दिसली आहे. या सुंदर अभिनेत्रीने देखील आपला प्रियकर जॉर्ज पानायियोटो च्या मुलाला जन्म दिला आहे. हे दोघीही यावर्षात लग्न करण्याचा विचार करत आहेत. मात्र दोघांनाही कोरोनामुळे आपले लग्न स्थगित करावे लागले. आता ते पुढच्या वर्षी लग्न करू शकतात.

नीना गुप्ता
नीना गुप्ता यांचे किस्से अगदी सामान्य आहेत. त्या आपल्या तारुण्यात वेस्ट इंडिज क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांना डेट करत होत्या. त्यांच्याबद्दल म्हणले जाते की त्यांनी लग्नाअगोदरच मुलगी मसाबा ला जन्म दिला होता.

माही गिल
अभिनेत्री माही गिल ने देखील याबद्दल खुलासा केला होता की ती एका मुलाची आई आहे. ही बातमी त्यांनी मागच्या वर्षी जाहीर केली होती. माही गिल ने देखील लग्न न करता बाळाला जन्म दिला होता. जिचे नाव विरोनिका आहे आणि वय 3 वर्ष आहे. अजूनपर्यंत त्यांनी लग्न केले नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *