करीना कपूरच्या वळणावर आहे शाहीद कपूरची पत्नी? बेबो सारखीच बिकिनी घालून दाखवतेय मादक अदा..

बॉलीवूडच्या कलाकारांचा अड्डा बनला आहे मालदीव. नेहमी कोणी ना कोणी मालदीवच्या समुद्रकिनारी आपल्या सुट्ट्या घालवायला जातात. याच दरम्यान शाहीद कपूर देखील आपल्या कुटुंबासोबत मालदीवला पोहचला आहे आणि शाहीदची हॉट पत्नी मीराने सर्वांना घायाळ करायला देखील सुरुवात केली आहे.

बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत या दिवसात पती सोबत सुट्ट्यांचा आनद घेत आहे. तेच, या दरम्यान ती सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय दिसत आहे. मीरा सुट्ट्या घालवण्यासाठी मालदीवला पोहोचली आहे, जिथे शाहीद कपूर आपल्या शर्टलेस फोटोमुळे चर्चेत आहे. तर, दुसरीकडे मीरा राजपूतने आपल्या बिकिनी वरील फोटोने सर्वांना हैराण केले आहे.

मीरा राजपूत ने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर एका स्टोरीमध्ये मालदीव मधील सुट्ट्यांचे काही झलक दाखवणारे फोटोज आणि व्हिडियोज शेयर केले आहेत, ज्यामध्ये ती समुद्राच्याकिनारी मजा करताना दिसत आहे तर कधी बिकिनी मध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. मीराने आपला एक फोटो शेयर केला आहे, ज्यामध्ये ती दरवाजाच्या काचेत मिरर सेल्फी घेताना दिसत आहे.
यामध्ये हे तर दिसत आहे की मीराने बिकिनी घातली आहे पण बिकिनीचा रंग मात्र समजत नाही आहे.

याव्यतिरिक्त शाहीद कपूरने देखील आपल्या इंस्टाग्राम खात्यावर एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये शाहीद शर्टलेस होऊन सेल्फी घेताना दिसत आहे. शाहीदने समुद्रकिनारी मजा करताना घेतलेला हा सेल्फी आहे. मीराने देखील रंगीत टॉप मध्ये फोटोज शेयर केले आहेत. ज्यामध्ये ती आपली फिगर दाखवताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *