करीनाच्या 12 कोटींच्या मागणी नंतर आता कंगना करणार ‘सीता’ ची भूमिका!! अगदी हटक्या अंदाजात अभिनेत्रीने केली घोषणा

बॉलीवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनौत या दिवसात आपल्या चित्रपट ‘थलायवी’ मुळे खूप चर्चेत आहे. कंगणाचे या चित्रपटात जय ललिता ची भूमिका साकारण्यासाठी खूप कौतुक केले जात आहे. याच दरम्यान कंगनाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. जय ललिताच्या भुमिकेनंतर आता कंगना लवकरच ‘देवी सीता’ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. याबद्दल स्वतः कंगनानेच सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

कंगना रनौतने आपल्या आधिकारिक इंस्टाग्राम खात्याच्या माध्यमातून एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून कंगनाने सांगितले आहे की ती अलौकिक देसाईच्या दिग्दर्शनाखाली बनणारा चित्रपट ‘सीता’ मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. कंगनाने आपल्या पोस्टमध्ये हे देखील सांगितले आहे की ती या भुमिकेसाठी खूप उत्साहित आहे. कंगनाने पोस्ट मध्ये लिहिले आहे की, ‘द इनकेरनेशन- सीता, मी खूप आनंदी आहे कारण या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची मला संधी मिळत आहे. सीता रामाच्या आशीर्वादाने. जय सियाराम.’

अलौकिक देसाई चा हा चित्रपट अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रीयांचे नावं समोर आले होते. याअगोदर बातमी ही होती की या चित्रपटासाठी ‘सीता’ च्या भूमिकेसाठी करीना कपूरला निवडले गेले आहे. मात्र करीनाने या चित्रपटासाठी 12 कोटी रुपये शुल्काची मागणी केली होती. ज्यानंतर ती भूमिका करीनाकडून आता कंगना रनौतकडे गेला आहे. या बातमीने कंगना रनौतच्या चाहत्यांमध्ये आनंद पसरला आहे.

हा चित्रपट एका पौराणिक कथेवर आधारित आहे. ज्याचे दिग्दर्शन अलौकिक देसाई करत आहेत. हा चित्रपट एका भव्य मंचावर होणार आहे. चित्रपटात संवाद मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे तसेच हा चित्रपट थोडा फार ‘बाहुबली’ शी संबंधीत असल्याची देखील माहिती येत आहे, मात्र त्याबद्दल खात्री नाही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *