दृश्यम चित्रपटातील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती आहे हा परदेशी व्यक्ती!!

संपूर्ण जगात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. देशभरातील हजारो लोक या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या विळख्यात आहेत. बॉलिवूड मध्ये देखील कनिका कपूर नंतर, करीम मोरानी यांचे कुटुंब, पुरब कोहली यांच्या कुटुंबांनंतर आता एक नवीन बाब समोर आली आहे.

दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरहिट अभिनेत्री श्रेया सरन ने एक चकित करून टाकणारा खुलासा केला आहे, तिने सांगितले की तिचे पती आंद्रेई कोसचीव यांना देखील कोरोनाचे लक्षण होते, ज्यानंतर ती आपल्या पतीला घेऊन दवाखान्यात गेली होती, परंतु दवाखान्यात उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांना सांगितले की तुम्ही लोक इथून परत चालल्या जा. तथापि तिचे पती आता पूर्णपणे ठीक आहेत.

विशेष म्हणजे आंद्रेई आणि श्रेया यांचे लग्न 2008 मध्ये झाले होते, तेव्हापासून श्रेया ही स्पेन मध्येच आहे. स्पेन त्या देशांमधून एक आहे, जिथे कोरोना विषाणूचे संक्रमण खूप जास्त आहे. इथे 1 लाख 72 हजार 541 लोक संक्रमित आहेत आणि आतापर्यंत कोरोनामुळे 18 हजार 56 लोकांचा जीव गेला आहे.

श्रेयाने हल्लीच एका बातमी पत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की तिचे पती आंद्रेई कोसचीव यांना कोरोना विषाणूचे लक्षण होते आणि या कारणामुळे त्यांना दवाखान्यात नेले होते. परंतु डॉक्टरांनी त्यांना भरती करण्याऐवजी पुन्हा घरी जायला सांगितले.

श्रेयाने टाइम्स ऑफ इंडिया ला सांगितले की, ” आंद्रेई ला कोरडा खोकला आणि ताप येऊ लागला. आम्ही दवाखान्यात पोहचलो आणि डॉक्टर्स या गोष्टीमुळे आनंदी होते की आम्ही त्वरित यावर लक्ष दिले, परंतु त्यांनी आम्हाला घरी जायला सांगितले.

त्यांचे म्हणणे होते की जरी त्यांना कोरोनाचे संक्रमण नसले तरी त्यांना तिथे दवाखान्यात कोरोनाचे संक्रमण होऊन जाईल. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की आम्ही घरी जाऊन स्वयं विलगीकरनात राहू आणि घरातच उपचार घेऊ.”

श्रेया म्हणाली की, ” आम्ही लोकांनी स्वतः ला स्वयं विलगीकरन केले. घरातच आंद्रेई वर उपचार केले गेले. मी आणि आंद्रेई आम्ही वेगवेगळ्या खोलीत झोपत होतो आणि स्वतः च अंतर नियंत्रित करत होतो

आता आंद्रेई ला खूप चांगले वाटत आहे आणि चांगले झाले की वाईट काळ मागे निघून गेला. या रोगाच्या दरम्यान स्वतः ला सावध, स्वच्छ आणि स्वतः ला फिट ठेवणे गरजेचे आहे. ”

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *