दवाखान्यातील रुग्णसेवीकेसोबत सर्किट चे झाले होते लग्न..!!! अनेक वर्षानंतर फोटो बघून लोकं झाले हैराण

‘ मुन्नाभाई एमबीबीएस ‘ हा लोकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे आणि लोकांनी या चित्रपटाचा खूप मनसोक्त आनंद देखील घेतला, मात्र एक गोष्ट अशी आहे की ती लोकांकडून राहून गेली, ज्यावर आता अनेक वर्षानंतर लोकांचे लक्ष गेले आहे. चित्रपटात लोकांनी मुन्नाभाई व सर्किट यांच्या जोडीला खूप पसंत केले होते, मात्र आज आम्ही या दोघांच्या जोडीबद्दल नाही बोलणार आहोत, तर त्या जोडीबद्दल सांगणार आहोत जी चित्रपटाच्या शेवटी बघायला मिळाली होती, म्हणजेच सर्किट आणि त्याची पत्नी.

होय, चित्रपटाच्या शेवटी मुन्नाभाई आणि सर्किट दोघांचेही लग्न होऊन जाते, जिथे मुन्ना आपली आवडती मुलगी डॉक्टर रुस्तमच्या मुलीसोबत लग्न करतो तर तसेच सर्किट देखील लग्न करून टाकतो ते पण चित्रपटात दाखवलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवीकेसोबत. होय, जरी तुमचे लक्ष यावर गेले नसेल, मात्र आता व्हायरल होत असलेल्या या फोटोकडे सर्वांचेच लक्ष जात आहे. चित्रपटात रुग्णसेवीकेच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्रीच चित्रपटात सर्किट ची पत्नी म्हणून दिसली होती. अनेक वर्षानंतर चाहते हा फोटो बघून हैराण होत आहेत आणि सोशल मीडियावर खूप वेगाने शेयर करत आहेत.

या चित्रपटात संजय दत्त एक गुंड होते, जो आपल्या वडिलांना आनंदीत करण्यासाठी एमबीबीएस ची पदवी घ्यायची असते. चित्रपटात सर्किट नावाचा त्याचा एक सोबती देखील होता, जो प्रत्येक कामात मुन्नाच्या सोबत दिसत असतो. सर्किटची भूमिका अर्शद वारसी यांनी साकारली होती, जी की आयकॉनिक भूमिका झाली होती.

तसेच चित्रपट ‘ मुन्नाभाई एमबीबीएस ‘ मध्ये ग्रेसी सिंह डॉ. सुमनच्या भूमिकेत दिसल्या होत्या, ज्यावर मुन्ना म्हणजेच संजय दत्त यांना प्रेम झाले होते. तेच बमन इराणी डॉ. सुमनच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले होते आणि डॉ. रुस्तम ही भूमिका साकारली होती. तसेच या चित्रपटाचा भाग दिग्गज अभिनेते सुनील दत्त देखील होते. वास्तविक आयुष्यासारखे ते संजय दत्त यांच्या वडिलांच्या भूमिकेत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *