तब्बल 28 वर्षांनंतर दामिनी मधील ही प्रसिद्ध अभिनेत्री बॉलीवूड मध्ये परतणार….

बऱ्याच वर्षांपूर्वी 80 च्या दशकात बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींच्या यादीत मीनाक्षी शेषाद्रीचे नाव समाविष्ट होते. मीनाक्षीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लाखो अंतःकरणावर राज्य केले. आता 28 वर्षानंतर मीनाक्षी बॉलिवूडमध्ये परतणार आहे.

मीनाक्षी शेषाद्रीने हीरो, शहंशाह, नाचे नागिन गली-गली, घायल, जुर्म, दामिनी, स्वाति, धारणा, मेरी जंग, सत्य मेव जयते अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तीच्या काळातील बहुतेक प्रत्येक मोठ्या अभिनेत्याबरोबर तीची जोडी हिट मानली जात होती.

मीनाक्षीने 1995 मध्ये लग्न केले आणि अमेरिकेत स्थायिक झाली. लग्नानंतर तीने अनेक अपूर्ण चित्रपट पूर्ण केले. तसेच तीला मोठ्या चित्रपटांंच्या ऑफर आल्या होत्या, पण मीनाक्षी एका मुलाखतीत म्हणाली की, “माझ्यासाठी हा परीक्षा वेळ होता.

अमेरिकेत आणि भारतात दोन्हीही कुटुंब सांभाळणे मला शक्य वाटत नव्हते . ” म्हणून शेवटी मी कुटुंबाची निवड केली आणि चित्रपटांच्या जगाला निरोप दिला. पण मला माहित होते की कधीतरी मी परत येईल.

आता मुले मोठी झाली आहेत, तेव्हा मी परत येऊ शकते, मित्रांनो, मी मला बॉलीवूडमध्ये परत यायला हवे असे मला माझ्या मुलांनी सांगितले आहे. याबद्दल मी जेव्हा चित्रपट निर्मात्यांशी बोलले तेव्हा त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला.

ती पुुढे म्हणाली की, मला माझ्याबद्दल माहिती आहे, मी आता एक न्यूकमर आहे. होय मी बर्‍याच दिवसांनंतर काम करत आहे. मला कोणती भूमिका मिळेल आणि मी ती स्वीकारेल की नाही हे सर्व वेळेवर अवलंबून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *