भारतीने सांगितली धक्कादायक गोष्ट, म्हणाली – ‘ कारकिर्दीच्या सुरुवातीला लोकं वाईट नजरेने बघायचे, ते माझ्या कमरेवर आपला…! ‘

विनोदी अभिनेत्री भारती सिंह आज घरा-घरात लोकप्रिय आहे. ती आज ज्या जागेवर आहे त्याच्यामागे खूप मोठा संघर्ष लपलेला आहे. भारतीचे व्यवसायिक आयुष्य जेवढे चांगले चालू आहे, तर तीचे खाजगी आयुष्य एकेकाळी तेवढेच बेकार चालू होती. जेव्हा भारती दोन वर्षांची होती तेव्हा तीच्या डोक्यावरून आपल्या वडिलांचे छत्र गेले होते. अशा परिस्थितीत भारतीच्या आईलाच तीला व तीच्या बहीण-भावंडांना सांभाळावे लागले होते. तेव्हा तीच्या घराची आर्थिक परिस्थती बरोबर नव्हती.

या दरम्यान भारतीने विनोदाला सुरुवात केली. मात्र काम भेटल्यानंतर देखील तीचा संघर्ष कमी नाही झाला. कारकिर्दीच्या सुरुवातीला लोकं तीला वाईट नजरेने हात लावत होते. तेव्हा भारतीमध्ये विरोध करायची समज व हिंमत यापैकी दोन्हीही नव्हते. या भीतीमुळे ती सेटवर आपल्या आईला घेऊन जात होती. हल्लीच भारती मनीष पॉल च्या पॉडकास्ट कार्यक्रमात सामील झाली होती. इथे भारतीने मनीषला आपल्या खाजगी आयुष्याशी संबंधित हैराण करून टाकणाऱ्या गोष्टी सांगितल्या.

भारती म्हणाली की, ‘ मी कार्यक्रमाच्या सेटवर आपल्या आईला सोबत घेऊन जात होती. त्यावेळेस माझ्यासारख्या कलाकारांसोबत त्यांचे वडील होते पण माझ्यासोबत माझी आई येत होती. लोकं आईला म्हणत होते की काकू तुम्ही चिंता नका करू, आम्ही तुमच्या मुलीची काळजी घेऊ. तेव्हा मॉडर्न गोष्टींबद्दल मला जास्त माहित नव्हते. जेव्हा कोणी माझ्या कमरेवर आपला हात रगडत असे तेव्हा मला समजत नव्हते की या स्पर्शाला चुकीच्या पद्धतीने केलेला स्पर्श म्हणले जाईल की नाही. ‘

तसेच भारतीने हे देखील सांगितले की वडिलांच्या लवकर जाण्यामुळे कधी त्यांचे प्रेम मला कधी मिळाले नाही. माझा भाऊ देखील कामात व्यस्त रहात होता. अशामध्ये लग्नानंतर जेव्हा हर्ष कडून प्रेम मिळाले तेव्हा समजले की जेव्हा एखादा पुरुष तुमची काळजी घेतो तुमच्यावर खूप प्रेम करतो तेव्हा कसे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *