अर्जुन कपूरने बहिणी बद्दल केला अजब खुलासा!! म्हणाला- ‘ती अंघोळ करताना….’

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर हल्लीच एका मासिकेच्या कव्हर पेजवर एकत्र झळकले होते. दोघेही कलाकार अजून पर्यंत पडद्यावर एकत्र आलेले नाही आहेत मात्र या दोन्ही कलाकारांची वास्तविक आयुष्यातील केमिस्ट्री ही खूप चांगली आहे. हल्लीच अर्जुन कपूरने इंस्टाग्रामवर एक व्हिडियो शेयर केला आहे. ज्यामध्ये दोन्ही कलाकार एकत्र बसून गप्पा मारताना दिसत आहेत.

या व्हिडियो मध्ये अर्जुन कपूर व जान्हवी कपूर मध्ये एक रॅपीड राउंड होताना दिसत आहे. अर्जुन कपूर व जान्हवी कपूर या व्हिडियोमध्ये एकमेकांबद्दल मनोरंजक प्रश्न-उत्तरे करताना दिसत आहेत. हा रॅपीड राउंडची मजा जेवढी अर्जुन कपूर व जान्हवी कपूर यांना येत आहे त्यापेक्षा जास्त मजा तो व्हिडियो बघणाऱ्या चाहत्यांना येत आहे.

बघता-बघता व्हिडियोला लाखात लाईक्स मिळाले आणि खाली टिप्पणीमध्ये लोकं आपले प्रेम व्यक्त करत आहेत.
मात्र दोन्ही भाऊ-बहिण जेव्हा एकमेकांच्या गुपीत गोष्टी उघडू लागतात तसा हा व्हिडियो आणखी मनोरंजक होऊ लागतो.

अर्जुन कपूरने व्हिडियोमध्ये सांगितले की जान्हवी कपूर जिथे पण जाते तर तिची सुटकेस ही नेहमी तिच्यासोबत असते आणि याचबरोबर अर्जुन कपूरने आणखी एक खुलासा केला आहे की जान्हवी कधीही अंघोळीला जात असते. यावर हसून कॅमेऱ्याकडे बघून जान्हवी म्हणते की- ‘तुमच्या घरी बाथरूम आहे का? मी येत आहे अंघोळ करायला.’

अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर या अगोदर देखील चित्रपट निर्माता करण जोहर यांच्या ‘कॉफी विथ करण’ टॉक शोमध्ये एकत्र दिसले आहेत. दोघांनीही या कार्यक्रमात आपल्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. अर्जुन कपूरने सांगितले की त्यांना व जान्हवी कपूर दोघांनाही समुद्रकिनारी फिरायला आवडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *