नीता अंबाणीच्या मेकअप वर होतो तब्बल एव्हडा खर्च, मेकअप करणाऱ्या आर्टिस्टचा पगार ऐकून थक्क व्हाल!!

नीता अंबानी या आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या पत्नी आहेत. त्यांचा फॅशन सेन्सही अप्रतिम आहे. प्रत्येक इव्हेंटमध्ये त्यांचे उत्कृष्ट स्टाइल स्टेटमेंट पाहून प्रत्येकजण दंग असतो. त्या कुठेही जातात तेव्हा त्यांचा मेकअपही त्यांच्या लुकनुसार केला जातो.

एक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट नीता अंबानींचा मेकअप करतो. चला जाणून घेऊया कोण आहे मेकअप आर्टिस्ट ज्याने नीता अंबानींना परफेक्ट बनविले आहे ?

मिकी कॉन्ट्रॅक्टर असे त्याचे नाव आहे. त्याने अनेक बड्या बॉलिवूड अभिनेत्रींचा मेकअप केला आहे. यामध्ये करीना कपूर, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा यांसारख्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे. मिकी कॉन्ट्रॅक्टर हा नीता अंबानींचा वैयक्तिक मेकअप आर्टिस्ट आहे.

जेव्हा-जेव्हा नीता अंबानींना गरज असते, तेव्हा तो त्यांच्या सेवेत हजर होतो. त्याने अनेक कार्यक्रमांमध्ये नीता अंबानींचा मेकअप केला आहे, ज्यामध्ये त्या अत्यंत सुंदर दिसतात. याशिवाय तो त्यांची मुलगी ईशा अंबानी आणि सून श्लोका अंबानीचा मेकअपही करतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिकी कॉन्ट्रॅक्टर मुंबईतील एका कार्यक्रमासाठी 75,000 रुपये आणि इतर ठिकाणी मेकअपसाठी 1 लाख रुपये आकारतो. ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांनी त्याला मेकअप आर्टिस्ट बनण्याची प्रेरणा दिली. त्याने स्ट्रगलिंग डेजमध्ये हेलनची केशभूषाकार म्हणून काम केले. त्यावेळी मिकी मुंबईतील प्रसिद्ध टोकियो ब्युटी पार्लरमध्ये हेअर ड्रेसर म्हणून काम करत असे.

मिकीने अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. ते आज चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. प्रसिद्ध चित्रपटांतील अभिनेत्रींचा मेकअप करण्याचे श्रेय त्यांना जाते. यामध्ये ‘हम आपके है कौन’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कल हो ना हो’, ‘मोहब्बतें’, ‘माय नेम इज खान’, ‘कार्तिक कॉलिंग’ यांचा समावेश आहे. ‘कार्तिक’, ‘डॉन’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘गुड न्यूज’, ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *