अनेक चित्रपटात काम करणारा हा अभिनेता आहे अमीर खानचा भाचा,या कारणामुळे घेतला अभिनय सोडण्याचा निर्णय!!

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा पुतण्या इम्रान खानने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा मित्र अक्षय ओबरॉयने एका मुलाखतीत असे सांगितले. आता इम्रान खान अभिनय सोडून इतर कुठल्याही क्षेत्रात नशीब आजमावण्याचा विचार करत आहेत.इम्रान खान गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर होता. इमरान खानने ‘जाने तू या जाने ना’ पासुन बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाशिवाय इम्रान खानने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यामध्ये त्याचा अभिनय खूपच आवडला आहे. तथापि, त्यानी चित्रपटसृष्टीत फारसे चित्रपट दिले नाहीत.

अभिनेता अक्षय ओबेरॉयने अभिनय सोडण्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे. अक्षयने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, इम्रान अभिनय सोडून चित्रपट दिग्दर्शनात आपला हात आजमावू शकतो. मुलाखतीत अक्षय म्हणाला, ‘माझा सर्वात चांगला मित्र इम्रान खान आता अभिनेता नाही. त्याने अभिनय सोडला आहे. तो माझा जवळचा मित्र आहे. मी पहाटे चार वाजता त्याला कॉल देखील करू शकतो. आम्ही 18 वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहोत.

अक्षयने इम्रानच्या भविष्याबद्दल सांगितले की, इम्रान अभिनय सोडून दिग्दर्शक होण्याचा विचार करत आहे. इम्रानला अभिनयाची चांगली समज आहे, म्हणून जरी भविष्यात तो अभिनय करू शकत नाही, तरी चित्रपटाचे दिग्दर्शन करू शकतो. इम्रान खानने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यानी अधिक यशस्वी चित्रपट दिले नाहीत. यावर अक्षय म्हणाला, इम्रानने काही हिट चित्रपट आणि काही फ्लॉप दिले, परंतु याला अयशस्वी अभिनेता म्हणता येणार नाही. इमरानने किडनैप, लक, आय हेट लव्ह स्टोरी सारख्या चित्रपटात काम केले आहे.

अशाच मनोरंजक बातम्यांसाठी आत्ताच लाईक बटन दाबा!!

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.