9 वर्षांनी लहान असलेल्या ‘टपू’ सोबत नातेसंबंधात आहे बबीता जी !! ‘या’ कारणामुळे झाला त्यांच्या नात्याचा खुलासा..

दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम आहे. मालिकेमधील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या दमदार अभिनयासाठी लोकप्रिय आहे. मात्र जेठालाल आणि बबीता जी यांच्या मधील केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडते. तथापि मालिकेत प्रेक्षकांना बबीता आणि जेठालाल ची जोडी पसंत आहे. मात्र वास्तविक आयुष्यातील मालिकेमधील दोन व्यक्तिरेखांमध्ये काहीतरी वेगळच शिजत आहे.

बबीता जी म्हणजेच मुनमुन दत्ताचे अफेयर जेठालाल चा मुलगा टपू ची व्यक्तिरेखा साकारणारा राज अंदकत सोबत चालू आहे. हे दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत, मात्र यावर कधी मुनमुन व राज दोघांपैकी कोणीच काही बोलले नाही आहे. तेच ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, हे स्पष्ट झाले आहे की मुनमुन दत्ता आणि राज अंदकत यांचे अफेयर चालू आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की राज मुनमुन पेक्षा 9 वर्षांनी लहान आहे.

तथापि अनेकवेळा सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी दोघांचेही अफेयर चालू असल्याचे बोलले आहे. नेहमी चाहते त्यांना हा प्रश्न करत होते की दोघांमध्ये काही चालू आहे का? तेच आता चाहत्यांचा संशय खरा ठरला आहे आणि हे स्पष्ट झाले आहे की हे दोघेही नातेसंबंधात आहेत. तसेच आश्चर्यचकित करणारी आणखी एक गोष्ट आहे की, मालिकेमधील प्रत्येकाला दोघांच्याही नातेसंबंधाबद्दल माहित आहे.

सूत्रांनुसार, मुनमुन दत्ता व राज अंदकत या दोघांच्या घरच्यांना देखील त्यांच्या ह्या नातेसंबंधाबद्दल माहित आहे. राज आता मात्र 24 वर्षांचा आहे आणि मुनमुन दत्ता प्पेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. तर सध्यातरी या दोघांनी आपल्या नात्याबद्दल काही स्पष्ट केले नाही आहे मात्र लवकरच तसे होईल असे काही सध्या वाटत तरी नाही आहे. येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच की नक्की काय आहे ते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *