17 वर्षांच्या मुलीचा पिता आहे सलमान!! बायको राहते दुबईत? सलमानचा खुलासा ऐकून चाहते झालेत थक्क…

हिंदी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता सलमान नेहमी चर्चेत राहतो. सलमान नेहमीच आपल्या अभिनयामुळे तसेच आपल्या खाजगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहतो. सलमान 55 वर्षांचे असून देखील अजून अविवाहित आहेत आणि चाहते उत्सुक आहेत की सलमानने अजून लग्न का नाही केलं? आणि अजून पर्यंत सलमान का अविवाहित आहेत? हल्लीच सलमान खान बद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

हल्लीच झालेल्या एक खुलाशात सांगितले गेले आहे की सलमानचे लग्न तर झाले आहे. सलमानची पत्नी दुबईत राहते आणि सलमानची एक 17 वर्षांची मुलगी देखील आहे. या खुलाशाने सोशल मिडियावर गोंधळ निर्माण केला आहे. सलमानचे चाहते हे ऐकून चकित होत आहेत. या दिवसात सलमान चा लहान भाऊ व अभिनेता अरबाज खानचा एक टॉक शो खूप चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हल्लीच सलमान, अरबाजच्या टॉक शो मध्ये पोहचले होते. या कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार अरबाजच्या पाहुण्यांना लोकांचे ट्विट वाचून त्याचे उत्तर द्यायचे असते. या दरम्यान एक ट्विट वाचून सलमान व अरबाज दोघेही थक्क झाले.

तर एका वापरकर्त्याने त्या ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘कुठे लपून बसला आहेस भित्र्या. भारतात सर्वांना माहित आहे की तू दुबईत आपली पत्नी नूर आणि 17 वर्षांच्या मुलीसोबत आहे. भारतातल्या लोकांना कधी पर्यंत येडा बनवशील.’ हे ऐकून अरबाज व सलमान दोघीही आश्चर्यचकित झाले. मग यावर सलमानने विचारले की, ‘हे कोणासाठी आहे?’ तर अरबाज खान म्हणाला ही टिप्पणी सलमान खानसाठी आहे.

सलमान यावर उत्तर देताना म्हणाला की, ‘या लोकांना खूप माहित आहे. हे सर्व फालतू आहे. मला नाही माहित की कोणाबद्दल बोलल आहे आणि कुठे पोस्ट केल आहे. हा जो कोणी आहे जो असा विचार करतो मी त्याला उत्तर देऊ इच्छितो की अरे माझ्या भावा माझी कोणीच पत्नी नाही आहे. मी भारतात राहतो, गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये वयाच्या 9 व्या वर्षापासून रहात आहे. मी फक्त या व्यक्तीला उत्तर देत नाही आहे तर पूर्ण जगाला माहित आहे की मी कुठे राहतो.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *