या होत्या दिग्गज कलाकारांच्या पहिल्या गाड्या

अमिताभ बच्चन- चित्रपटसृष्टीचे शेनशहा म्हटले जाणारे अमिताभ बच्चन यांची जीवनशैली पाहून बड्या उद्योगपतींनासुद्धा आश्चर्य वाटले. आज अमिताभ बच्चन यांच्याकडे 20 पेक्षा जास्त वाहने आहेत. पण त्यांचे पहिले वाहन फियाट होते, कित्येक महिन्यांच्या कमाईनंतर अमिताभ यांनी ही कार विकत घेतली होती.

सलमान खान- बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान हा चित्रपट उद्योगातील नामांकित लेखक सलीम खानचा मुलगा आहे. पण आपल्या छंद पूर्ण करण्यासाठी सलमानने कधीही वडिलांवर दबाव आणला नाही.

सलमानने स्वत: च्या उत्पन्नातून आपली पहिली कार खरेदी केली. त्याची पहिली कार हेराल्ड होती जी ऋषी कपूर यांनी ‘जमाना’ चित्रपटात चालविली होती.

शाहरूख खान- बॉलिवूडमध्ये अत्यंत खडतर प्रवास करणाऱ्या शाहरुख खानचे जेव्हढे कौतुक कराल तेव्हढे कमीच आहे.आज त्याची गणना केवळ भारतातच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत कलाकारांमध्ये केली जाते.1992 मध्ये दीवाना या चित्रपटाद्वारे शाहरुखने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता आणि त्यांची पहिली कार ओम्नी होती.

अक्षय कुमार- मध्यमवर्गीय कुटुंबातील असणारा अक्षय कुमार बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी रेस्टॉरंट्समध्ये शेफ म्हणून काम करायचा. आयुष्याची अनेक वर्षे धडपडीत घालवल्यानंतर या अभिनेत्याने नंतर चाहत्यांची मने जिंकली. अक्षयची पहिली कार सेकंड-हँड फियाट होती, जी त्याने 28 हजारांमध्ये खरेदी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.