शाहरुख खान च्या ‘या’ अभिनेत्री ने भारतीय क्रिकेट संघाच्या माजी प्रसिद्ध गोलंदाजशी बांधली लग्नाची गाठ…. अशी होती त्यांची रहस्यमय प्रेम कहाणी…

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू जहीर खानची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे ने नुकताच आपला 35 वा वाढदिवस साजरा केला आहे. सागरिकाचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी कोल्हापुर,महाराष्ट्रात झाला होता. सागरिका घाटगे नी बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरूवात सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खानपासून केली होती.

सागरिका बॉलिवूडमधील चक दे इंडिया या चित्रपटात पहिल्यांदा दिसली होती. या चित्रपटात शाहरुख खान महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. सागरिका राष्ट्रीय स्टार हॉकी पटू ही राहिलेली आहे. सागरिका घाटगे नी भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रसिद्ध गोलंदबाज झहीर खानशी लग्न केले. सागरिका चे वडील विजय घाटगे यांनीही बॉलिवूडमध्ये काम केले आहे. तर तीची आजी सीताराजे घाटगे ही इंदौर चे महाराजा तुकोजीराव होल्कर यांची मुलगी होती. सागरिका एका राजघराण्यातील आहे. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी आपण जाणून घेऊया…

सागरिका शिकत असताना, त्यावेळी तीला अ‍ॅड फिल्मच्या ऑफर येऊ लागल्या. सागरिकाने वर्ष 2007 मध्ये बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. तिच्या पहिल्याच चित्रपटातून ती प्रेक्षकांवर आपली जादू पसरवू शकली. ‘चक दे इंडिया’ मधल्या चमकदार अभिनयाबद्दल तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा स्क्रीन अवॉर्डही मिळाला होता.

सागरिका केवळ हिंदी चित्रपटांपुरती मर्यादित नाही. तर तिने पंजाबी आणि मराठी भाषेच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती राष्ट्रीय पातळीवरील हॉकीपटू देखील आहे आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिकाचे हृदय माजी क्रिकेटर झहीर खानवर आले होते. युवराज सिंग आणि हेजल कीचच्या रिसेप्शन दरम्यान या दोघांमधील संबंध उघडकीस आले. युवराज आणि हेजल यांच्यासमवेत सागरिका-झहीरचा फोटोही व्हायरल झाला.

असे म्हणतात की सागरिका आणि झहीर खान यांची भेट एका समान मित्राने केली होती. एका मुलाखतीत झहीरबद्दल बोलताना सागरिका म्हणाली होती की, ‘मी आणि झहीरची भेट आमच्या मित्र हृतिकच्या माध्यमातून झाली. मी जेव्हा जेव्हा हृतिकला भेटली होते तेव्हा मी म्हणायचे की झहीर चांगला मुलगा आहे. भेटीनंतर दोघांचे एकमेकांबद्दल प्रेम वाढवण्यास सुरुवात झाली. दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि मग सागरिका-झहीरने एक व्हायचं ठरवलं. 24 एप्रिल 2017 रोजी या दोघांचा साकारपुडा झाला,आणि ह्याच वर्षी 23 नोव्हेंबर रोजी त्यांचे लग्न झाले.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.