कुठे गायब झाला हा स्टारकीड असलेला सुपरस्टार चा मुलगा,केले होते ब्लॉकबस्टर पदार्पण!!

‘जुबली कुमार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बॉलिवूड अभिनेता राजेंद्र कुमार यांचा मुलगा बॉलीवूडमध्ये पदार्पण करताच रातो रात सुपरस्टार बनला.कुमार गौरव चे नाव सर्वत्र झाले.आणि तो बॉलीवूडचा नवीन चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाऊ लागला.

कुमार गौरवने 1981 साली ‘लव्ह स्टोरी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल रावल होते आणि विजेते पंडित हे चित्रपटात कुमार गौरवच्या विरुद्ध दिसले होते. चित्रपटाच्या गाण्यांपासून तर अभिनत्यां पर्यंत सर्व सुपरहिट झाले.खासकरुन कुमार गौरव त्याच्या रोमँटिक पात्र आणि लुकमुळे खूप लोकप्रिय झाला.

बॅक टू बॅट फ्लॉप या चित्रपटां मुले लवकरच त्याची लोकप्रियता कामी झाली. काही वर्षांनंतर त्याला ‘वन फिल्म वंडर’ ही पदवीही देण्यात आली. तो काही वर्षांनी मोठ्या पडद्यावरून पूर्णपणे गायब झाला.

कुमार गौरवने तेरी कसम, स्टार, लवर्स और फिर रोमांस सारखे चित्रपट केले. पण तेरी कसम वगळता त्याचा कोणत्याही चित्रपटाचे कौतुक झाले नाही. 1985 मध्ये ‘नाम’ या चित्रपटात तो संजय दत्तसोबत दिसला होता. हा चित्रपट हिट ठरला होता पण लाईमलाइट संजय दत्तने घेतला होता.

बरीच ब्रेकनंतर कुमार गौरव दिग्दर्शक संजय गुप्ताच्या कांते चित्रपटात दिसला. नया लूक, नया अंदाज हा चित्रपट 2002 मध्ये प्रदर्शित झाला होता त्याचा हा शेवटचा हिट चित्रपट होता.या चित्रपटात संजय दत्त, अमिताभ बच्चन, सुनील शेट्टी हे कलाकार त्याच्यासोबत दिसले होते.

त्यानंतरच कुमार गौरवने चित्रपट जगताला निरोप देण्याचा निर्णय घेतला.त्याचे नाणे चित्रपटसृष्टीत स्थायिक होऊ शकले नाहीत,परंतु तो आज एक मोठा उद्योगपती आहे. कुमार गौरवचा मालदीवमध्ये ट्रॅव्हल व्यवसाय आहे.यासह काही बांधकाम व्यवसायही आहेत.

कुमार गौरव आपल्या व्यवसायिक जीवनात आनंदी आहे आणि चित्रपटांपासून दूर आसल्याचे कसलेही खंत मणात नाही.कुमार गौरवने मुलाखतीत सांगितले होते की, ‘मला कशाविषयीही खंत नाही. आपन काहीतरी गमावतो आणि काहीतरी कमवतो,हेच प्रोफेशनल जीवन असते.

Leave a Reply

Your email address will not be published.