५३ वर्षीय राजेश खट्टर ,शाहिद कपूरचे सावत्र पिता पुन्हा झाले वडील !!

टीव्ही सिरीयल ‘बेपनाह’ चा अभिनेता, शाहिद कपूर यांचे सावत्र पिता आणि ईशान खट्टर यांचे वडील राजेश खट्टर वयाच्या 53 व्या वर्षी पुन्हा वडील झाले आहेत.त्यांची पत्नी वंदनाने मुलाला जन्म दिला असून,राजेश आणि वंदनाच्या लग्ना ला 11 वर्ष झाले होते,आणि ते खूप काळ या आनंदा च्या बातमी ची वाट पाहत होते.

बाळाचा जन्म अडीच महिन्यांपूर्वी झाला असला तरी या जोडप्याने ही बातमी लपवून ठेवली कारण त्यांचा मुलगा रुग्णालयात एनआयसीयूमध्ये दाखल झाला होता आणि जन्माष्टमीच्या दिवशी या जोडप्याने मुलाला घरी आणले.एका मुलाखतीत राजेशने सांगितले होते की तो जुळ्या मुलाची अपेक्षा करत होता,परंतु काही गुंतागुंती झाल्यामुळे डॉक्टर एका मुलाला वाचवू शकले नाहीत, परंतु आता तो या दु:खातून मुक्त झाला आहे,आणि आपल्या नवजात मुलावर लक्ष केंद्रित करत आहे.

राजेशने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की वयाच्या 50 व्या वर्षी माझे वडील होणे माझ्यासाठी एक आव्हान होते,परंतु अस करनारा मी पहिला किंवा शेवटचा नाही. थिएटर आर्टिस्ट असलेल्या पत्नी वंदना यांच्याशी बोलताना ते म्हणाले की, 11 वर्षातच आम्हाला तीन गर्भपात, तीन आययूआय आणि तीन आयव्हीएफ फ्लूअर आणि बरेच प्रयत्न करून एक मुलगा झाला आहे.

मी माझे आनंद शब्दांत व्यक्त करू शकत नाही.मला माझी कहाणी सर्वांना सांगायची आहे. जेणेकरून आपल्यासारख्या जोडप्यांनी कधीही आशा सोडली नाही पाहीजे आणि कायम विश्वास ठेवला पाहीजे.

आपला मुद्दा पुढे म्हणत वंदना म्हणते की मला जुळी मुले होतील आणि मी जगातील सर्वात आनंदी महिला आसेल अस माला वाटत होते. परंतु गर्भधारणेच्या तिसर्‍या महिन्यात डॉक्टरांनी मला संगितले की गर्भाशयाला टाके घालावे लागतील,मला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पुढचे तीन महिने मी हॉस्पिटलमध्ये होते आणि मला हालचाल करण्याची परवानगी नव्हती.तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण होता.मी हताश होते पण मी हारले नाही.

मला माहित आहे की मला संघर्ष करावा लागेल.म्हणून मी हार मानली नाही. मुल माझ्यासाठी प्रथम होते, त्यासाठी मी कोणत्याही प्रकारचे वेदना सहन करण्यास तयार होते,माझा मुलादेखील हार मानली नाही, त्याने एनआयसीयू मधे अडीच महिने लढा दिला.मुलाचे नाव सांगताना वंदना म्हणाली की, “मी व राजेश यांनी मुलाचे नाव वनराज कृष्ण खट्टर ठेवले आहे”. राजेश खट्टर ईशानचे वडील आहेत. राजेश खट्टर ईशानच्या आई नीलिमा आझमीचा दुसरा नवरा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.