या बॉलिवूड मधील भाऊ भावंडाचे वयाचे अंतर आहे माय लेकी एव्हडे..

रिलेशनशिपमध्ये सनी देओल आणि ईशा देओल हे सावत्र भावंडे आहेत. ज्याच्या मधील वयातील अंतर सुमारे 25 वर्ष आहे. ईशा ही अभिनेता धर्मेंद्रची दुसरी पत्नी, हेमा मालिनी ची मुलगी आहे, तर सनी हा धर्मेंद्र च्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर चा मुलगा आहे.

सारा अली खान आणि तैमूर अली खान यांच्या वयामध्ये 23 वर्षांचा फरक आहे. सारा ही अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी आहे, तर तैमूरची आई करीना कपूर असून तिने 2012 मध्ये सैफशी लग्न केले होते.

शाहिद कपूर आणि ईशान खट्टर हेही त्या भावंडांपैकी एक आहेत ज्यांचे वयातील अंतर बरेच आहेे. दोघांमध्ये 14 वर्षांचा फरक आहे.शाहिद, पंकज कपूर आणि नीलिमा अजीम यांचा मुलगा आहे, तर ईशान नीलिमा आणि राजेश खट्टर यांचा मुलगा आहे.

अर्जुन कपूर आणि जाणव्ही कपूर या दोघांच्या वयातील 12 वर्षांचे अंतर आहे. फिल्ममेकर बोनी कपूरने अभिनेत्री श्रीदेवीशी दुसर्‍यांदा लग्न केले. जाणव्ही ही त्यांची मुलगी आहे, तर अर्जुन कपूर बोनी कपूर आणि मोना कपूर यांचा मुलगा आहे. संजय दत्तने आतापर्यंत तीन विवाहसोहळे केले आहेत, त्याला पहिल्या पत्नीपासून मुलगी त्रिशला आहे. तर तिसर्‍या पत्नी मान्यता दत्त पासून शाहरान दत्त आणि इकरा दत्त ही दोन मुले आहेत. या सावत्र भावंडांच्या वयातील अंतर देखील 23 वर्षे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.