बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री स्मिता पाटील अजूनही तिच्या अभिनयासाठी आठवली जाते ,वयाच्या 31 व्या वर्षी तिने हे जग सोडले.स्मिता पाटील चा जन्म 17 ऑक्टोबर रोजी झाला होता. काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चनने ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर झालेल्या कथेचा उल्लेख केला होता,ते म्हनाले की, स्मिताला उद्या सेटवरकाय होणार आहे याची आधीच जाणीव होती.
अमिताभ बच्चन म्हणाले होते की, ‘मी कुलीच्या चित्रीकरणासाठी बंगळुरूमध्ये होतो.रात्रीचे दोन वाजले असता स्मिता पाटील चा फोन आला.स्मिता पाटील फोनवर असल्याचे रिसेप्शनिस्टने मला सांगितले.मला आश्चर्य वाटले कारण मी तिच्याशी इतक्या रात्री यापूर्वी कधीही बोललो नव्हतो. मला वाटले काहीतरी महत्त्वाचे आसेल म्हणून मी त्याच्याशी बोललो.अमिताभ म्हणाले की, आम्ही दोघांनीही नमक हलाल आणि शक्ती सारख्या चित्रपटात काम केले आहे.
ते पुढे म्हणाले की स्मिताने मला विचारले तुम्हि ठीक आहात ना? मी हो म्हणालो,मग ती म्हणाली “मला तुमच्याबद्दल नुकतेच एक वाईट स्वप्न पडले आहे.” म्हणूनच मी रात्रभर तुम्हाला कॉल केला. दुसर्या दिवशी ‘कुली’ च्या सेटवर माझा अपघात झाला, असे अमिताभ यांनी सांगितले.या घटनेत बिग बी यांना गंभीर दुखापत झाली.
पुनीत इस्सर आणि अमिताभ बच्चन यांच्यात बेंगळुरू विद्यापीठ परिसराच्या फाईट सीनसाठी लढा सुरू असल्याचे स्पष्ट केले, यादरम्यान, अमिताभ एका टेबला धडकले ज्यामध्ये ते गंभीरपणे जखमी झाले.त्यांला तातडीने मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. बिग बींनी एकदा आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की रुग्णालयात व्हेंटिलेटर लावण्यापूर्वी त्यांला वैद्यकीय मृत् यू घोषित करण्यात आले होते.