बॉलिवूड मध्ये खिलाडी म्हणून प्रसिद्ध असलेले अक्षयकुमार जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढीच त्यांची मुले सुद्धा आहेत. तुम्हाला हे सुद्धा माहित असेल की अक्षयला दोन मुले आहेत एक मुलगा व एक मुलगी परंतु त्यांच्या मुलीबद्दल बोलायचे झाले तर ते नेहमी आपल्या मुलीला मीडिया पासून लांब ठेवतात.
ते जितके आपल्या मुलीला कॅमेऱ्यापासून लपवतात तितकेच लोक हे त्यांच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला अक्षय नाही तर त्यांची मुलगी नितारा बद्दल सांगणार आहोत.
खरतर आपल्या व्यस्त असलेल्या वेळापत्रकातून वेळ काढून अक्षय अलीकडेच आपली मुलगी नितारा व बायको ट्विंकल सोबत चित्रपट पहायला गेले होते याचं दरम्यान त्यांचे काही फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये ते आपली मुलगी नितारा सोबत दिसत आहेत. हा फोटो रविवारचा आहे जेव्हा ते आपल्या मुलीला चित्रपट दाखवायला घेऊन गेले होते.
या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की नितारा ने क्रीम रंगाचा फ्रॉक आणि नक्षीदार सॅडल परिधान केली आहे. या फोटोमध्ये नितारा खूपच गोड दिसत आहे. तसेच अक्षय हा काळया डेनिम्स वर मिलिटरी छपाई वाली हुडी मध्ये दिसला. अक्षय आणि नितारा चे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की निताराने पहिल्यांदा मीडियाचा सामना केला आहे. होय, जेव्हा नितारा बाहेर पडली तेव्हा लगेच सगळे मेडियावाले त्यांचे फोटो घेऊ लागले. अशा पिस्थितीत नितारा समोर अनेक छायाचित्रकार पाहून घाबरली.
यांनतर निता स्वतः ला सांभाळले आणि ती पण आपल्या आई वडिलांसोबत पुढे चालू लागली. अक्षय आणि ट्विंकल सोबत नितारा सुद्धा खूप मस्त दिसत होती. यानंतर अक्षय आपल्या पत्नीसोबत जेवायला सुद्धा गेले. खरतर या फोटो मध्ये अक्षय काळजी घेणारा वडील सुद्धा दिसू शकतो.
अक्षय व त्यांची पत्नी ही आपल्या मुलांना घेऊन खूप संरक्षक आहेत. यापूर्वी बऱ्याचदा अक्षयचे फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये ते नितारा चा चेहरा लपवत आहेत.
सोशल मीडियावर नितारा चे फोटो शेअर करताना आपला चेहरा लपवण्यास प्रयत्न करतो. म्हणून असे म्हणणे चुकीचे नाही ठरणार की दोघे सुद्धा आपल्या व्यस्त वेळापत्रकातून मुलांसाठी वेळ काढतात.