या 4 अभिनेत्री आपल्या पतीच्या पहिल्या लग्नात होत्या एव्हड्या लहान,एक तर होती फक्त 1 वर्षाची !!

बॉलिवूड मध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी दोन किंवा अधिक विवाह केले आहेत. चित्रपट जगतातले बहुतेक अभिनेते त्यांच्या पत्नींपेक्षा वयस्कर आहेत. अशा परिस्थितीत आज आपण सांगणार आहोत की या कलाकारांच्या पहिल्या लग्नाच्या वेळी त्यांच्या दुसर्‍या पत्नीचे वय काय होते, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

हेमा मालिनी – बॉलिवूडची ड्रीम गर्ल अभिनेत्री हेमा मालिनी सुपरस्टार धर्मेंद्रची दुसरी पत्नी आहे. धर्मेंद्रने हेमाशी लग्न करण्यासाठी धर्मांतर केले होते आणि गुप्तपणे लग्न केले. पण त्याचे हे दुसरे लग्न होते. धर्मेंद्रचे पहिले लग्न वर्ष 1955 मध्ये प्रकाश कौरसोबत झाले होते. हेमा मालिनी चा जन्म 16 ऑक्टोबर 1948 रोजी झाला होता. अशाप्रकारे, पती धर्मेंद्रच्या पहिल्या लग्नाच्या वेळी हेमा मालिनी अवघ्या 7 वर्षांची होती.

शबाना आझमी – शबाना आझमी प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर ची दुसरी पत्नी आहे. जावेद अख्तरचे पहिले लग्न 1972 मध्ये हनी इराणीशी झाले होते. जावेद एकेकाळी मद्यपी झाला होता, त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर खूप परिणाम झाला होता. जावेद अख्तरची सद्य पत्नी शबाना आझमी चा जन्म 18 सप्टेंबर 1950 रोजी झाला होता. शबाना ही बॉलिवूड अभिनेत्री देखील आहे. जावेदच्या पहिल्या लग्नाच्या वेळी ती सुमारे 22 वर्षांची होती.

लीना चंदावरकर- अभिनेत्री लीना चंदावरकर ही किशोर कुमारची चौथी पत्नी होती. किशोर कुमारची कहाणी अत्यंत धक्कादायक आहे. किशोर कुमार हा अतिशय रंगीबेरंगी स्वभावाचा होता. प्रसिद्ध गायक आणि अभिनेता किशोर कुमार चे प्रथम लग्न 1951 मध्ये रूमा गुहा ठाकुरताशी झाले होते. तर किशोर कुमार ची चौथी पत्नी लीना चंदावरकर यांचा जन्म 1950 मध्ये झाला होता आणि त्यावेळी ती फक्त 1 वर्षाची होती.

करीना कपूर- बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर देखील बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे. 1991 मध्ये अमृता सिंगसोबत सैफ अली खानचा पहिला विवाह झाला होता. त्यावेळी अमृता बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री होती. पण नंतर त्यांचे घ^ट स्फो^ट झाले. सैफ अली खानची सध्याची पत्नी करीना कपूर चा जन्म 21 सप्टेंबर 1980 रोजी झाला होता. पती सैफ अली खानच्या पहिल्या लग्नाच्या वेळी करीना कपूर नुकतीच 11 वर्षांची होती. असे म्हटले जाते की करीना कपूर सैफ अली खान च्या पहिल्या लग्नातही अतिथी होती आणि करिनाने काका म्हणून सैफचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.