जेव्हा अमिताभ बच्चन ने सर्वांसमोर केले होते पत्नी सोबत लीप लोक,लाजिरवाणी झालेल्या अभिषेक ने दिली होती अशी प्रतिक्रिया!!

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 48 वर्ष पूर्ण झाली आहेत. 3 जून 1973 रोजी अमिताभ आणि जयाचे घाईघाईने लग्न झाले. आपल्या लग्नाच्या वाढदिवशी अमिताभने इंस्टाग्रामवर दोन फोटोंचे कोलाज शेअर केले आहे. दरम्यान, अमिताभ-जयाचा हा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात दोघेही एकमेकांना सार्वजनिकपणे किस करतना दिसत आहेत.

ही गोष्ट 2014 च्या स्टार स्क्रीन अवॉर्ड्सचे आहे. जिथे अमिताभ ला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. जेव्हा अमिताभ हा पुरस्कार घेऊन मंचावरुन परत आला तेव्हा तो थेट समोरच्या जागी बसलेल्या आपल्या कुटुंबाकडे गेेला व त्यानंतर पत्नी जयाशी बोलताना गर्दीच्या मेळाव्यात त्याने तिला किस केले.

यादरम्यान मुलगा अभिषेक बच्चन दोघांच्या मध्ये बसला होता. मग दोघांनीही एकमेकांना लिपलॉक करण्यापासून रोखले नाही. अभिषेक स्वत: आई-वडिलांनीचे असे चुंबन पाहून स्तब्ध झाला, त्यानंतर त्यानेही रिएक्शन दिली. मुलाची प्रतिक्रिया पाहताच अमिताभनेही त्याला मिठी मारली आणि मग स्वत: हसणे सुरू केले.

जया जेव्हा पुण्याच्या एफटीआयआयमध्ये शिकत होती, तेव्हा अमिताभ पहिल्यांदा ‘सात हिंदुस्तानी’ (1969) या चित्रपटासाठी इथे आला होता. जयाही त्याला ओळखत होती. हृषीकेश मुखर्जी ने यापूर्वी अमिताभ बच्चनला जया भाादुडीसह ‘गुड्डी’ चित्रपटासाठी कास्ट केले होते. नंतर या चित्रपटातून अमिताभ बच्चन ला बाजूला करण्यात आले.

जया आणि अमिताभची ओळख हृषीकेश मुखर्जी ने त्याच्या ‘गुड्डी’ चित्रपटाच्या सेटवर केली होती. यानंतर 1973 साली अमिताभ बच्चन आणि जया ‘जंजीर’ या चित्रपटात एकत्र दिसले. या चित्रपटादरम्यान दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 1973 मध्ये जंजीरच्या यशानंतर त्याला जंजीरचे यश लंडनमध्ये आणि त्याच्या इतर मित्रांसह साजरे करायचे होते. पण त्याचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी त्याच्यासमोर अट ठेवली होती.

जेव्हा त्यांना कळले की अमिताभला लंडनला जायचे आहे, तेव्हा हरिवंश राय यांनी त्याला विचारले – तुला कोणाबरोबर जायचे आहे? तेव्हा अमिताभ ने जयाचे नाव घेतले तेव्हा ते ताबडतोब म्हणाले की- तु आधी लग्न कर आणि मग जा…. तु त्याशिवाय जाऊ शकत नाही. दोघांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. बन्सी बिरजू या चित्रपटात अमिताभ आणि जया यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले होते. यानंतर त्यांनी ‘जंजीर’, ‘अभिमान’, ‘चुपके चुपके’, ‘मिली’, ‘शोले’ ‘सिलसिला’, ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published.