2019 सालची घटना आहे. एकीकडे संपूर्ण जग नवीन वर्षाच्या उत्सवात मग्न असताना, दुसरीकडे एक दुःखद बातमी आली. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, संवाद लेखक कादर खान यांनी या जगाला निरोप दिला. या बातमीने बॉलिवूड जगतात एकच शोककळा पसरली होती. कादर खान यांच्या मृ-त्यू-नंतर त्यांच्या सोबत काम केलेले अनेक कलाकार त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी पुढे सरसावले.
दिवगंत कादर खान यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये ते सांगत आहेत की, अमिताभ बच्चनला सर जी न म्हटल्यामुळे त्यांच्या हातून कसा चित्रपट निघून गेला होता. बिझनेस ऑफ सिनेमाचा हा व्हिडिओ 2012 मध्ये यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. यामध्ये कादर खान म्हणत आहेत की, एका साउथ प्रोड्यूसरने त्यांना अमिताभ बच्चनला सरजी म्हणण्याचा सल्ला दिला होता.
पण ते यासाठी तयार नव्हते. कारण ते अमिताभ यांना प्रेमाने अमित म्हणायचे. कादर यांच्या मुलाखतीनुसार, त्यांनी प्रोड्यूसरचे ऐकले नाही आणि अमिताभ यांना सर जी म्हटले नाही तेव्हा त्यांना चित्रपटातून बाहेर काढण्यात आले, यासोबतच या घटनेनंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे त्यांचे नातेही बिघडले.
या घटनेचा कादर खान यांच्या चित्रपट करिअर वर भरपूर प्रभाव पडला. अमिताभ बच्चन स्टारर ‘खुदा गवाह’ चित्रपटात देखील त्यांना जागा मिळू शकली नाही. यासोबतच ‘गंगा जुमना सरस्वती’ची स्क्रिप्टही त्यांनी अर्धवट लिहिली होती. नंतर नंतर त्यांना काम मिळणे कठीण होऊ लागले. महानायकाला सर न म्हणणे त्यांना चांगलेच महागात पडले.
अमिताभ राजीव गांधी यांचे जवळचे मित्र होते. आपल्या मित्राची मदत करण्यासाठी अमिताभ यांनी राजकारणात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. ते 1984 मध्ये झालेल्या 8 व्या लोकसभा निवडणूकीत इलाहाबाद सीटवरुन क्राँग्रेसचे कँडिडेट होते. निवडणूकीच्या निकालाने अमिताभ यांच्या विरोधकांना चकीत केले होते. अमिताभ बच्चन यांना जवळपास 2.65 लाख मत मिळाले होते. तर त्यांच्या विरोधी हेमवती नंदन बहुगुणा यांना 1.14 लाख वोट मिळाले होते.
पण अमिताभ बच्चन जास्त दिवस सत्तेत राहू शकले नाही. 1987 पुर्वीच त्यांनी खासदार पदावरुन राजीनामा दिला होता. ते राजकारणासाठी फिट नाही. बोफोर्स दलाली वादात अमिताभ आणि त्यांचा भाऊ अजिताभवर आरोप लावण्यात आले. यानंतर त्यांनी क्राँग्रेस आणि राजकारणाला रामराम ठोकला. पण ते खासदार बनले होते तेव्हा इंडस्ट्रीचे लोक त्यांना सर जी म्हणून हाक मारायचे.
अक्टोबर 2012 मध्ये कादर खानने मुलाखतीत म्हटले होते, “अमिताभसोबत माझे एक नाते होते. जेव्हा तो एमपी बनून दिल्लीत गेला तर मी आनंदी नव्हतो. कारण सत्तेची जग असे आहे, जिथून लोक बदलून परत येतात. तो जेव्हा परत आला, तेव्हा तो माझा अमिताभ बच्चन नव्हता. मला खुप दुःख झाले.”
कादर खान पुढे मुलाखतीत म्हणाले होते, “तो मला असेही म्हणाला होता की, जर तुला राजकारणी घेऊन जात आहेत, तर घेऊन जाऊ दे… जर तु तिथे गेला तर मी उभा होऊन तुझ्या विरुध्द पब्लिसिटी करेल, हा माणुस चुकीचा आहे, याला वोट देऊ नका असे सांगेल. तुला हरवून टाकेल. एमपी बनल्यानंतर तो खुप चेंज झाला होता.”
कादर मुलाखतीदरम्यान म्हणाले होते की, अमिताभ आता पहिल्यासारखा वागत नाही, पण ते त्यांना आपला सर्वात चांगला मित्र मानतात. कादर खानने अमिताभ बच्चन साठी ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘नसीब’ आणि ‘अग्निपथ’ सारख्या चित्रपटांचे डायलॉग लिहिले होते.