व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अडचणीत पडली अंकिता लोखंडे, सुशांतच्या चाहत्यांनी केली टीका….

14 जूनचा काळा दिवस आजही सुशांतच्या रसिकांच्या मनातून जात नाही. हा दिवस होता जेव्हा सुशांतने आपल्या सर्वांना निरोप देऊन जग सोडले. परंतु आजपर्यंत त्याच्या जाण्याने झालेलेे दुुःख त्याच्या प्रियजनांना आणि त्याच्या कुटुंबीयांना आहे. हेच कारण आहे की 5 महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे परंतु तरीही अजून सुशांतला न्याय मिळाला नाही.

दुसरीकडे सुशांतसाठी सतत आवाज उठविणारी त्याची माजी मैत्रीण अंकिता लोखंडे चे नवीन पोस्ट पाहून असेही म्हटले जात आहे की, ती देखील आपल्या आयुष्यात बर्‍याच प्रमाणात पुढे गेली आहे. अंकिता हे सगळं विसरून पुढे गेेली आहे, आणि हे सुशांतच्या प्रियजनांना अजिबात आवडत नाही. यामुळेच तिला सोशल मीडियावर वापरकर्त्यांचा राग सहन करावा लागत आहे.

अलीकडेच अंकिता लोखंडे ने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो की ती तिच्या आयुष्यात किती पुढे गेली आहे, हे सिद्ध करतो. यामुळे सुशांतचे चाहते निराश झाले आहेत, आणि सुशांत आणि त्याच्या न्यायासाठीचा लढा या गोष्टी विसरल्याबद्दल चाहत्यांनी अभिनेत्रीला वाईट म्हणण्यास सुरुवात केली आहे.

अंकितावर कटाक्षाने बोलताना एका ट्रोलरने लिहिले की, ‘तू खरोखर खूप आनंदी आहेस ना ना दीदी… सुशांतला कधीही न्याय मिळणार नाही.’ एका वापरकर्त्याने लिहिले की “सुशांतला अद्याप न्याय मिळाला नाही हे फार वाईट आहे.” आणि तू. ” त्याचवेळी एका व्यक्तीने लिहिले की “ सुशांत निघून गेल्यानंतर तुला खुप आनंद झाला आहे… रहस्य काय आहे? त्याच्यावर तू सुध्दा जलस होतीस असे वाट त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.