बॉलिवूड स्टार्सच्या अभिनयाव्यतिरिक्त चाहते त्यांच्या लूक आणि स्टाईलवरही फिदा होतात. कधीकधी असे वाटते की वर्षे जात आहेत, पण कलाकारांच्या वयामद्ये काही फरक पडत नाही. फिल्मी दुनियेत असे अनेक कलाकार आहेत जे वर्षानुवर्षे इंडस्ट्रीचा एक भाग आहेत आणि ते खूप जास्त वयाचे आहेत. पण तरीही ते चित्रपटांमधील 30 वर्षाच्या अभिनेत्यासारखे वाटतात. चित्रपटांमध्ये हे कलाकार पाहणे व त्यांच्या वास्तविक वयाचा अंदाज घेणे खूपच कठीण आहे.
अनिल कपूर
जेव्हा खूप हँडसम अभिनेत्यांचा विचार केला तर पहिले नाव सुपरस्टार अनिल कपूरचे आहे. अनिल कपूर हा बरीच वर्षे चित्रपट जगातील एक भाग आहे आणि त्याने एकापेक्षा जास्त हिट चित्रपट दिले आहेत. अभिनेता अनिल कपूर अभिनयाबरोबरच वयाच्या बाबतीतही सदाहरित आहे. अभिनेता 64 वर्षांचा झााला आहे पण तो अजूनही 30-40 वर्षांचा वाटतो.
शाहरुख खान
या यादीमध्ये बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा देखील समावेश आहे. वयाच्या 55 व्या वर्षीही शाहरुख मोठ्या पडद्यावर एक जवान हीरो आहे. शाहरुखकडे बघून तो 55 वर्षांचा असल्याचे कोणीही म्हणू शकत नाही. हँडसम हिरोच्या यादीत शाहरुखही अव्वल आहे.
आमिर खान
मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान बहुतेक चित्रपटांमध्ये अगदी तरूण लूकमध्ये दिसतो. ‘3 इडियट्स’ असणारा कॉलेज स्टूटेंट असो किंवा ‘धूम 3’ मद्ये डॅशिंग आणि सुंदर दिसणारा चोर असो. आमीर नेहमी पडद्यावर तरुण दिसतो. आमिर खान 56 वर्षांचा आहे. आमिर अजूनही चित्रपटांमध्ये तरुण पात्रे साकारतो.
सैफ अली खान
या यादीमध्ये बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान याचेही नाव आहे. सैफ अली खानने चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत, आता तो वेब सिरीजमध्येही काम करत आहे. त्याची शेवटची सीरीज तांडव अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाली होती. सैफ अली खानच्या वयाबद्दल सांगायचे झाले तर तो 50 वर्षांचा आहे, पण पडद्यावर त्याचे वय 30-55 वर्षे आहे असे वाटते.
अक्षय कुमार
वर्षभरात बर्याच चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता म्हणजेच, अक्षय कुमारच्या नावाचाही या यादीमध्ये समावेश आहे. अक्षय कुमार 53 वर्षांचा आहे पण तो 30 वर्षांचा तरुण असल्याचे दिसते. अक्षय कुमार अजूनही चित्रपटात लहान मुलाची भूमिका साकारतो. अक्षय कुमार पडद्यावर जितका फिट दिसतो, त्याहून अधिक तो खऱ्या आयुष्यात अधिक देखणा दिसतो.