ही अभिनेत्री म्हणतेय तिला एक लाख रुपये दिले तर स्वतःच्या सख्ख्या भावासोबत ‘हे’ करायला तयार.. केला खळबळजनक खुलासा..

अभिनेत्री सारा अली खान आजकाल तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते . तिच्या याच स्वभावामुळे गेल्या वर्षी तिने सर्वाधिक लोकप्रिय स्टार किड्समध्येही पहिले स्थान पटकावले. खूपच कमी वेळाच्या कारकिर्दीत तिने आपल्या चाहत्यांचं हृदय जिंकलंय. गूगलवर सर्वाधिक वेळा साराला सर्च करण्यात आले आहे.

सोशल मीडियावरसुद्धा आजकाल सर्वत्र सारा अली खानचीच चर्चा असते. साराने बॉलिवूडमध्ये खूप कमी वेळात अनेक चित्रपट केले आहेत. विशेष म्हणजे केदारनाथ चित्रपटाद्वारे तीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती आणि त्यात साराच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली होती.

यानंतर त्यांचा दुसरा चित्रपट ‘सिंबा’ आला.रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपटात ती रणवीर सिंगसोबत दिसली. अशाप्रकारे सारा तिच्या दुसर्‍याच चित्रपटात 200 कोटी क्लब अभिनेत्रीत सामील झाली. या गोष्टीमुळे तिला फक्त दोन चित्रपटांनंतरच लिस्ट ए यादीतील अभिनेत्रींमध्ये समाविष्ट केले गेले.

अलीकडेच सारा तिच्या एका ताज्या मुलाखतीबद्दल चर्चेत आहे. वास्तविक सारा ‘फेमस्ली फिल्म फेअर सीझन 2’ मध्ये दिसली होती. या मुलाखतीत साराने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या. या भागामध्ये तिला एक कोटी रुपयांच्या बदल्यात आपला भाऊ अब्राहम याला तू कानाखाली मारू शकते का असे विचारले होते. तर सारा हसली आणि म्हणाली, “मी माझ्या भावाला एक लाख रुपयातसुद्धा कानशिलात लगावू शकते.”

खरंतर हे सर्व सारा चेष्टा मस्करी मध्ये बोलली होती. आपणा सर्वांना माहितच आहे की प्रत्येक भावंडांमध्ये लहान मोठी भांडणे होतच असतात. भावंडांना मजेसाठी एकमेकांचे पाय खेचणे आवडते. अशा परिस्थितीत साराच्या या वक्तव्यावर तिचा भाऊ अब्राहमची काय प्रतिक्रिया येतेय हे बघण्यासाठी उत्सुक आहेत.

नंतर एका खाजगी मुलाखतीत साराने कार्तिक आर्यनबद्दलही चर्चा केली आहे. सारा म्हणाली की तिला कार्तिक गोंडस वाटतो. त्याआधी सारा जेव्हा ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आली तेव्हा तिने सांगितले की तिला कार्तिक आर्यनला डेट करायचे आहे.

नुकतेच सारा अली खान आणि कार्तिक आर्यन दोघे ‘लव्ह आजकाल’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसले होते. दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना भरपूर आवडली. या चित्रपटाने चांगली कमाई केली. आणि कार्तिक ची भरपूर स्तुती देखील झाली.

साराच्या मुलाखतीचा हा प्रोमो आता इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुलाखतीत लोकांना साराच्या बोलण्याची शैली फार आवडली आहे. सारच्या बोलण्यात ती स्टार कीड असल्याचा गर्व अजिबात दिसत नाही आणि त्यामुळेच तिच्या चाहत्यांमध्ये ती प्रसिद्ध आहे. ती प्रत्येक उत्तर मोठ्या प्रामाणिकपणे देते.

Leave a Reply

Your email address will not be published.