चित्रपटसृष्टीत सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीची मदत घेतली जाते आणि यामध्ये काही चुकीचे पण नाही आहे. अशा अनेक अभिनेत्रीया आहेत ज्यांनी प्लास्टिक सर्जरीने आपल्या चेहऱ्याला अजूनच सुंदर बनवले आहे. तसेच काही अभिनेत्रीया अशा आहेत ज्यांच्यावर सर्जरी भारी पडली आहे.
मेकओवर नंतर अभिनेत्रीयांचे बदललेले रूप हे चाहत्यांना पसंत नाही आले आणि त्यांना प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी खूप ट्रोल केले गेले. चला तर जाणून घेऊया त्या अभिनेत्रींबद्दल ज्यांनी प्लास्टिक सर्जरी मुळे चाहत्यांची टीका झेलली आहे.
राखी सावंत ने आपल्या कारकिर्दीची सुरुवात चित्रपट ‘ अग्निचक्र ‘ पासून केली होती. स्वतः ला आणखी आकर्षक बनवण्यासाठी राखी ने सर्जरीचा आधार घेतला. आधी त्यांचे ओठ खूप पातळ होते, अशा परिस्थितीत त्यांना ओठाला थोडे मोठे बनवण्यासाठी राखीने प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतला.
राखीने अनेक सर्जरी केले आहेत ज्यामुळे त्यांना टीकाकरांनी प्लास्टिकची दुकान देखील म्हणले आहे. सोशल मीडियावर आज देखील लोक त्यांना ट्रोल करतात. राखीने देखील प्लास्टिक सर्जरी ची गोष्ट मान्य केली आहे.
सहर तबर ही इंस्टाग्रामची स्टार आहे. 2017 मध्ये त्यांच्याबद्दल बातमी आली की एंजेलिना जोली सारखे दिसण्यासाठी त्यांनी 50 प्लास्टिक सर्जरी केल्या. तथापि त्यांना फॉलो करणारे लोक त्यावेळी म्हणाले होते की हे सर्व ती मेकअपच्या बळावर करत होती. काही वापरकर्त्यांचे म्हणणे होते की त्यांनी सर्जरी करून आपला पूर्ण चेहरा खराब केला आहे.
श्रुती हसन ही दाक्षिणात्य चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने देखील नाकाची सर्जरी केली आहे. तिने ‘वारनम आयिरम’ (2008), ‘पृथ्वी’ (2010), ‘उद्यान’ (2011), ‘येननामो येधो’ (2014) सोबत बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. श्रुती ने ही गोष्ट देखील मान्य केली आहे की तिने सर्जरी केली आहे.
बिगबॉस 13 चा भाग असलेली अभिनेत्री कोएना मित्रा ने आपल्या नाकाची सर्जरी केली होती पण ते चांगले होण्याच्या ऐवजी बिघडून गेल. नंतर चित्रपट दिग्दर्शक तिला आपल्या चित्रपटात घेण्यापासून घाबरु लागले.
असे म्हणले जाते की प्लास्टिक सर्जरी मुळे त्यांच्याकडे कामाची कमतरता झाली आणि त्यांना जवळपास सहा महिने घरीच बसावे लागले होते. कोएना याला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक मानते. प्लास्टिक सर्जरीबद्दलचे आपले दुःख तीने बिगबॉस मध्ये देखील उल्लेख केला होता.