आपल्यापेक्षा 3 वर्ष मोठ्या असलेल्या ऐश्वर्यासोबत लग्न करण्यामागे होते हे ‘दोन मोठे’ कारणं.. अभिषेकने केला खुलासा

बॉलिवूड ही एक अशी इंडस्ट्री आहे ज्यात रोज काहीना काही घटना घडतच असतात. याच बॉलिवूडने जश्या ऑन स्क्रीन जोड्या बनवल्या आहेत तसेच बर्याच रिअल लाईफ जोडप्याना जोडण्यात ही बॉलिवूड इंडस्ट्रीचा खूप मोठा हात आहे. अनेक सेलेब्रिटी असे आहेत जे या माध्यमातून एकमेकांना भेटले.. एकमेकांच्या प्रेमात पडले.. आणि मग विवाहबंधनात अडकले.

असंच एक सर्वांचं आवडतं जोडपं म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन. १९९४ साली झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत ऐश्वर्या जगज्जेती ठरली होती. त्यानंतर ऐश्वर्या रायला बॉलिवूड मधून अनेक ऑफर्स येऊ लागल्या. बॉलिवूड मध्येहि तिने एका पेक्षा एक चांगले चित्रपट केले आहेत आणि प्रेक्षकांच्या मनात घर करू यशाच्या शिखरावर पोहोचली आहे.

तसेच अभिषेक बच्चननेही बॉलिवूड मध्ये खूप चांगले चित्रपट देऊन चांगली प्रसिद्धी मिळवली आहे. ऐश्वर्या ही तिचा पती अभिषेक बच्चन पेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे. पण अभिषेकने त्याच्यापेक्षा ३ वर्षांनी मोठ्या असलेल्या ऐश्वर्याशी लग्न का हे केल तुम्हाला क्वचितच माहित असेल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अभिषेकने ऐश्वर्याचे सौंदर्य पाहून तिच्याशी लग्न केले नाही.

तर मग असे काय कारण होते की अभिषेकने त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी असलेल्या ऐश्वर्याशी लग्न केले असावे. ऐश्वर्या सोबत साखरपुडा होण्याच्या अगदोरच अभिषेक बच्चन ने बॉलिवूड ची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरशी साखरपुडा केला होता. कारण अभिषेकचे करिष्मा कपूर वर खूप प्रेम होते.

करिष्मा कपूरचा आणि अभिषेक बच्चन यांच्या साखरपुड्या नंतर करिश्माने सांगितले होते की अभिषेकने तिला डायमंड रिंग देऊन देखील प्रपोज केले होते. अशा परिस्थितीत तिला अभिषेकला नाही हि म्हणता आले नाही असे करिष्मा कपूर ने सांगितले. जया बच्चन यांच्यामुळे या दोघांचे नातं तुटले असेही बोलले जाते. कारण जया बच्चन यांना करिश्मा अजिबात आवडत नव्हती.

पण एका मुलाखतीत जया बच्चन यांनी बोलतांना म्हटले होते की अभिषेकमुळेच हा साखरपुडा मोडला गेला होता. बातमीनुसार, अभिषेकसोबत लग्न झाल्यानंतर करिश्मा अभिषेक सोबत बच्चन कुटुंबापासून दूर राहणार होती. पण करिश्माचा हा निर्णय अभिषेकला मान्य नव्हता. अशा परिस्थितीत, जेव्हा करिश्माने अभिषेक चे ऐकले नाही, तेव्हा त्याकारणामुळे अभिषेकला तो साखरपुडा मोडावा लागला.

मग करिष्मा शी नातं तुटल्यानंतर अभिषेक ने ऐश्वर्या राय शी लग्न केले. अभिषेक ने २००७ मध्ये ऐश्वर्या शी लग्न केले. पण मग त्याच्या पेक्षा ३ वर्षांनी मोठ्या असलेल्या ऐश्वर्या शी लग्न का केल. अभिषेकने एका मुलाखतीत स्वतःच या विषयी खुलासा केला आहे. अभिषेकने या मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, त्याच्या पेक्षा 3 वर्षांनी मोठी असलेल्या ऐश्वर्याशी लग्न करण्याचे कारण ऐश्वर्याचे सौंदर्य नाही तर काहीतरी वेगळे आहे.

अभिषेक म्हणतो की त्याने ऐश्वर्या बरोबर लग्न फक्त या कारणासाठी केले नाही ती बॉलिवूडची सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे किंवा ती मिस वर्ल्ड राहिली आहे. त्यापेक्षा ऐश्वर्याशी लग्न करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ती एक अद्भुत व्यक्ती आहे. अभिषेक म्हणतो की त्याने त्या ऐश्वर्याशी लग्न केले आहे जी रात्री मेकअपशिवाय राहतो.

विशेष म्हणजे अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न 2007 साली झाले होते. आता ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन ला एक मुलगी देखील आहे तिचे नाव अराध्या असून ती खूप छान दिसतच नाही तर ती खूप छान बोलते देखील. आराध्या बच्चन आता ८ वर्षांची आहे. तसेच आराध्या आता फोटो काढण्यासाठी आपल्या आई सारख्याच खूप छान पोज देते.

Leave a Reply

Your email address will not be published.