संजू बाबाची मुलगी आहे बॉलिवूड अभिनेत्र्यांपेक्षाही हॉट.. फोटोज पाहून थक्क व्हाल..

संजय दत्त आपल्या चित्रपटांप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यात कॉन्ट्रोव्हर्सीसाठी सुद्धा प्रसिद्ध असतो. सध्या संजय दत्त पुन्हा एकदा चर्चेत आला आहे ते त्याला झालेल्या फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे. यानिमित्ताने पुन्हा एकदा संजय दत्तचे वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रसार माध्यमे आवडीने नवनवीन विषय चघळताना दिसत आहेत.

संजय दत्त सध्या दुबईमध्ये उपचार घेत असून त्याच्या सोबत त्याची पत्नी आणि दोन मुले सुद्धा आहेत. संजय दत्तला त्रिशला ही अजून एक मुलगी असून रिचा शर्मा ह्या संजय दत्तच्या पहिल्या पत्नीपासूनची ती मुलगी आहे.त्रिशला अतिशय सुंदर असून सोशल मीडियावरील तिचे एकटी चे फोटो आणि संजय दत्त सोबतचे फोटो खूप व्हायरल होत असतात व त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पसंती सुद्धा दिली जाते.

संजय दत्तची मुलगी त्रिशाला आपल्या वडिलांपासून हजारो मैल दूर राहते. त्रिशालाने बॉलीवूडमध्ये यायची इच्छा दाखवली होती, पण संजय दत्तने असे म्हणून नकार दिला होता की दत्त खानदानच्या स्त्रिया चित्रपटांमध्ये काम करत नाही. पण संजू विसरून गेला की त्याची आई नर्गिस देखील एक अभिनेत्री होती आणि बॉलीवूडमध्ये तिचे नाव फार आदराने घेतले जातात.

त्रिशला इतकी सुंदर असूनही व आई-वडील आणि आजी आजोबा हे बॉलीवूड मधील इतके ज्येष्ठ कलाकार असून सुद्धा त्रिशला बॉलीवुड पासून दूर असून आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये ती आपले करिअर करत आहे. त्रिशला ही संजय दत्तला पहिली पत्नी रिचापासून पासून झालेली मुलगी असून रिचाचे कॅन्सरने अगदी लहान वयातच निधन झाले होते.

त्यानंतर त्रिशला आपल्या आईच्या कुटुंबासोबत न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाली.त्रिशला ने क्रिमिनल सायकॉलॉजी मध्ये हाँफस्त्रो युनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पूर्ण केले असून कायद्याचेसुद्धा शिक्षण तिने घेतले आहे ती एक व्यावसायिक मानसोपचार तज्ञ म्हणून काम करते .तसेच अमेरिकेतील ड्रीम ड्रेसेस हेअर एक्सटेंशन या व्यवसायाची स्थापना केली आहे.

त्रिशला पूर्वी खूप जाड होती मात्र व्यायाम आणि सकस व योग्य आहाराच्या आधारे त्रिशला ने मोठ्या प्रमाणात आपले वजन घटवले आणि आपले वजन घटवण्याच्या अनुभवांना शेअर सुद्धा केला होते.त्याला आपले वजन घटवण्यासाठी उत्सुक असलेल्या अनेकांनी प्रेरणादायी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.