श्रीदेवीने या जगाला निरोप दिल्यानंतर 3 वर्षे उलटून गेली आहेत. 24 फेब्रुवारी 2018 ची ती काळी रात्र होती जेव्हा अभिनेत्रीने या जगाला निरोप दिला. विशेष म्हणजे बाथटबमध्ये बु’डण्यामुळे सुपरस्टार श्रीदेवीनेया जगाला निरोप दिला. ही संपूर्ण घटना दुबईतील एका हॉटेलमध्ये घडली, त्यावेळी पती बोनी कपूर तीच्याबरोबर त्या हॉटेलमध्ये होता.
श्रीदेवी गेल्यानंतर तिचा नवरा बोनी कपूरने त्या रात्रीची संपूर्ण कहाणी सांगितली. त्या रात्री त्याने सांगितले की बोनी कपूरचे संपूर्ण कुटुंब एका लग्नात सहभागी होण्यासाठी दुबईला गेले होते. 20 फेब्रुवारी रोजी हे लग्न झालंं होते, नंतर बोनी कपूरचे काही तरी काम होते, त्यामुळेे तो भारतात आला. पण जेव्हा तो भारतातून पुन्हा दुबईला गेला तेव्हा त्याने त्याच्या पत्नीला निर्जीव अवस्थेत बाथटबमध्ये पडलेले पाहिले.
वास्तविक, त्या रात्रीचे संपूर्ण सत्य बोनी कपूरने त्याची खास मैत्रिण कोमल नहताला सांगितले होते, जे नंतर त्याने एका ब्लॉगद्वारे उघड केले. हेच बोनीने कोमलला सांगितले होते की, ’24 फेब्रुवारी रोजी सकाळी मांझे श्रीदेवींशी संभाषण झाले होते, त्या वेळी आम्ही कॉलवर बोललो होतो. पापा (श्रीदेवी बोनीला त्याच नावाने हाक मारत असत), मी तुझी आठवण काढत आहे. ‘पण मी संध्याकाळी तीला भेटायला दुबईला येत आहे असं मी तीला सांगितले नाही.
जाह्नवीलासुद्धा मी दुबईला यावं अशी तीचीही इच्छा होती. आश्चर्यचकित करण्यासाठी बोनी कपूर संध्याकाळी दुबईला पोहोचला आणि खोलीची डुप्लिकेट चावीही घेतली. श्रीदेवीने त्याला सांगितले की, तिला माहित होते की तू मला भेटण्यासाठी नक्कीच दुबईला येशील. यानंतर बोनी कपूर फ्रेश होण्यासाठी गेला. जेव्हा तो परत आला, तेव्हा मी त्याला रोमांटिक डिनरसाठी प्रस्ताव दिला.
बोनी च्या म्हणण्यानुसार, “श्रीदेवी रात्रीच्या जेवणासाठी आंघोळीसाठी गेली होती आणि मी भारत दक्षिण आफ्रिका सामन्याबद्दल अपडेट होण्यासाठी लिविंग रूम मद्ये बसलो होतो. मग मला अचानक वाटलं की आज शनिवार आहे, म्हणून सर्व हॉटेल्समध्ये गर्दी होती, तेव्हा 8 वाजले होते. मग मी श्रीदेवीला आवाज दिला पण दोनदा आवाज दिल्या वरही तिने काहीच प्रतिसाद दिला नाही.
आवाज देताना मी बेडरूममध्ये आलो, मी बाथरूमचा दरवाजा ठोठावला आणि पुन्हा आवाज दिला. पण तरीही आवाज आला नाही, बाथरूममधून नळाचा आवाज सतत येत होता. मी पुन्हा एकदा माझा आवाज दिला, पण यावेळीसुद्धा आवाज आला नाही तेव्हा मी धक्का देऊन बाथरूमचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मला दिसले की बाथटबमध्ये श्रीदेवी निर्जीव अवस्थेत पडली होती, त्यावेळी तिच्या शरीरात कोणतीच हालचाल नव्हती.