श्रीदेवीपासून ते पंड्याच्या पत्नी पर्यंत या अभिनेत्रींनी गर्भधारणा झाल्यामुळे केले लग्न!!

चित्रपटातील कलाकार बर्‍याचदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असतात. बॉलिवूड जगात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नाआधीच आपल्या बाळाची प्लानिंग केेली होती आणि आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत ज्या लग्नानंतर काही महिन्यांनंतरच आई झाल्या. तर अनेक अभिनेत्रींनी मुलाला जन्म दिल्यानंतरही लग्न केले नाही.

अ‍ॅमी जॅक्सन…
अभिनेता अक्षय कुमारबरोबर स्क्रीन सामायिक करणारी अभिनेत्री एमी जॅक्सनने अद्याप लग्न केलेले नाही. ती बॉयफ्रेंड जॉर्जबरोबर रिलेशनशिपमध्ये असून तिने एका मुलाला जन्म दिला आहे. दोघेही बर्‍याच दिवसांपासून लिव्ह-इनमध्ये आहेत.

लिजा हेडन…
क्वीन, हाऊसफुल 3 आणि आयशा यासारख्या यशस्वी चित्रपटातील अभिनेत्री लिसा हेडॉनने स्वत: लग्नापूर्वीच तिच्या गरोदरपणाविषयीची माहिती दिली होती. लिसाने बॉयफ्रेंड डिनो लालवानीसोबत सन 2016 मध्ये लग्न केले होते. विशेष म्हणजे दोघांची आई असलेेली लिसा लवकरच तिसर्या मुलाचे स्वागत करणार आहे.

कोंकणा सेन शर्मा…
2020 साली पती रणवीर शोरेशी घटस्फोट घेणारी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा मुलगा हारून ची आई आहे. 2010 साली कोंकणा आणि रणवीरचे लग्न झाले होते. असं म्हणतात की शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढली आणि मग दोघांनीही एकमेकांना आपले हृदय दिलेे. लग्नाआधीच कोंकणा गर्भवती होती. कोकणा व रणवीर लग्नाच्या 6 महिन्यांनंतर पालक झाले होते.

नताशा स्टॅनकोविच…
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने एका वर्षापूर्वीच नताशा स्टॅनकोविचशी लग्न केले आहे. लग्नाच्या काही महिन्यानंतर नताशा स्टॅनकोविच आणि हार्दिक मुलगा अगस्त्यचे पालक झाले होते.

श्रीदेवी…
हिंदी सिनेमाची पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसुद्धा लग्नाआधीच गर्भवती होती. 1996 मध्ये श्रीदेवीने चित्रपट निर्माता बोनी कपूरशी लग्न केले. बोनी आणि श्रीदेवी लग्नाच्या काही महिन्यांनंतर मुलगी जान्हवी कपूरचे पालक बनले. नंतर श्रीदेवीने दुसरी मुलगी खुशिला जन्म दिला.

सारिका हासन…
सारिका हासन आणि दाक्षिणात्य चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेता कमल हासन लग्नाआधीच कन्या श्रुति हासनचे पालक झाले होते. लग्नाआधी सारिका केवळ गर्भवती नव्हती तर तिने लग्नापूर्वी श्रुतीला जन्म दिला होता. श्रुतीच्या जन्मानंतर सारिका आणि कमलने लग्न केले. लग्नानंतर सारिका आणि कमल यांना आणखी एक मुलगी झाली ज्याचे नाव त्यांनी अक्षरा हासन ठेवले.

Leave a Reply

Your email address will not be published.