चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करणे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते, परंतु ही ओळख काहीवेळा सामाजिक अंतर देखील निर्माण करते. काही स्टार सोबत असेच काही घडते जेव्हा ते त्यांच्या लग्नाची बातमी लीक करत नाहीत.माधुरी दीक्षितने सर्वात गुप्त पद्धतीने लग्न केले आहे. माधुरीने 1999 साली अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये डॉक्टर श्रीराम नेनेशी छुप्या पद्धतीने लग्न केले.
या यादीमध्ये धर्मेंद्रचे नाव प्रथम आले आहे. लग्न करूनही तो हेमा मालिनीच्या प्रेमात पडला होता. दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली आणि नंतर खंडाळ्यामध्ये छुप्या पद्धतीने लग्न केले. धर्मेंद्र आधीपासूनच विवाहित असल्याने हेमा मालिनीचे पालक या विवाहाच्या विरोधात होते.
सैफ अली खानने त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंगशी गुप्तपणे लग्न केले. या दोघांमधील संबंध सैफच्या पालकांना मान्य नव्हते. या दोघांनी 1991 साली छुप्या पद्धतीने लग्न केले आणि 2004 साली ते विभक्त झाले. यानंतर सैफने करीना कपूरसोबत लग्न केले.रणवीर शोरे आणि कोंकणा सेन शर्मा यांनी एकमेकांना बर्याच दिवस डेट केले होते. कोंकणा गर्भवती असल्यामुळे सप्टेंबर २०१० मध्ये दोघांचे लग्न झाले.
संजय दत्तने मान्यता दत्तला दोन वर्षे डेट केले, आणि 2008 साली गुप्तपणे लग्न केले. संजय दत्तचे हे तिसरे लग्न होते आणि त्याने बरेच दिवस हे लपवून ठेवले होते.
वरुण धवनने त्याची बालपणातील मैत्रीण नताशा दलालशी अतिशय सोप्प्या मार्गाने लग्न केले आहे, पण बॉलिवूडमध्ये हे प्रथमच घडत नाही. तर या अगोदरही बरीच लग्नं छुप्या पद्धतीने झाली आहेत.अभिनेत्री राणी मुखर्जी आणि निर्माता आदित्य चोप्रा यांनीही बरेच दिवस एकमेकांना डेट केले. 2014 मध्ये दोघांनी इटलीमध्ये अगदी सोप्प्या मार्गाने लग्न केले.
जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू हे बॉलिवूडचे सर्वात सुंदर जोडपे होते.पण नंतर दोघाचेही ब्रेकअप झाले. यानंतर जॉनने अचानक प्रिया रुंचलशी लग्न केले. या लग्नामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले.
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीनेही बोनी कपूरशी छुप्या पद्धतीने लग्न केले. बोनी कपूरचे आधीच लग्न झाले होते. लग्नानंतर बोनी कपूरने आपली पहिली पत्नी मोना कपूरशी घटस्फोट घेतला.