‘मी छोटे कपडे घातल्यावर लोक मला वाईट नजरेने बघतात’ म्हणत अभिनेत्री झाली भावुक..

बॉलिवूड मध्ये चर्चेत राहण्यासाठी कलाकार काय काय करतील ह्याचा काही नेम नाही. आता कोरोनाकाळात तर चित्रपट प्रदर्शित होत नाहीयेत तर अश्या वेळी चर्चेत राहण्यासाठी अशे प्रकार सर्रास घडत आहेत. अश्याच एका घटनेने सध्या बॉलिवूड मध्ये खळबळ माजली होती, ते म्हणजे एका अभिनेत्रीने दिलेल्या धक्कादायक विधानामुळे.

2001 साली रिलिज झालेला ‘स्टाईल’ हा चित्रपट सर्वांना आठवत असेलच. त्याकाळी संपूर्ण तरुणाईला या चित्रपटाने अक्षरशः वेड लावले होते. हा चित्रपट कॉमेडी प्रकारचा असून बॉलिवूड स्टार शरमन जोशीने याच चित्रपटातुन पदार्पण केले होते. शरमन सोबतच आणखी एका अभिनेत्रीने या चित्रपटातुन पदार्पण केले होते ती म्हणजे अभिनेत्री रिया सेन.

बॉलिवूड अभिनेत्री रिया सेनचे पूर्ण नाव रिया देव वर्मा आहे. रियाचा जन्म 24 जानेवारी 1981 रोजी झाला होता. अभिनेत्री रिया ही आपल्या कुटुंबातून एकटी स्टार नसून तिचे जवळपास संपूर्ण कुटुंबच बॉलिवूड मध्ये सक्रिय राहिले आहे. रियाची आजी सुमित्रा सेन, आई मून मून सेन, बहीण राइमा सेनही अभिनेत्री राहिल्या आहेत. त्यामुळे रियाची बॉलिवूड मधील वाटचाल त्यामानाने सोयीस्कर राहिली.

रियाने वयाच्या फाल्गुनी पाठक यांच्या संगीत व्हिडिओ ‘याद पिया की आए लगी’ मध्ये काम केले होते. तेव्हा पासून ती एक मॉडेल म्हणून ओळखली जाऊ लागली. हे गाणे सुपारहित ठरले. आणि त्यांनतर ती संगीत व्हिडिओ, दूरदर्शन जाहिराती, फॅशन शो आणि मासिकांच्या मुखपृष्ठांवर दिसु लागली.

रिया सेन यांची बॉलिवूड कारकीर्द कायमच वादाचा विषय राहिली आहे. मग ते अभिनेता अश्मीत पटेल सोबतचा लीक झालेला एम एम एस असो किंवा मग डब्बू रत्नानी यांच्या कॅलेंडर साठी तिने केलेले अर्ध न-ग्न फोटोशूट असो. एवढेच नव्हे तर त्या काळात बॉलिवूड मध्ये अगदी साधे सरळ चित्रपट बनवले जातात असत. आणि रिया च्या हॉट प्रतिमेमुळे तिला कायम टीकेचा सामना करावा लागत असे.

वास्तविक, अलीकडेच रियाने एका मुलाखतीत तिच्या बो-ल्ड प्रतिमेबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे. वयाच्या 16 व्या वर्षी चित्रपट मिळवणे इतके सोपे नसल्याचे रियाने सांगितले. रियाने सांगितले की बर्‍याच चित्रपटाच्या ऑफरही आल्या आहेत, रियाने अनेक हिट चित्रपट दिले पण त्याचवेळी तिची बोल्ड आणि मा-दक प्रतिमाही तयार झाली.

तो म्हणाला जेव्हा मी छोटे कपडे घालते तेव्हा मला ‘सेक्सी आणि बोल्ड’ सारखे टॅग लावले जातात. ही गोष्ट मला आजूबात आवडत नाही आणि मला त्यांच्या मानसिकतेचे वाईट वाटते. जेव्हा मी शाळेत होते तेव्हापासूनच मला हे टॅग मिळू लागले आहेत.

मी बाहेर गेले की लोक म्हणायचे अरे ही तर रिया सेन वाटत नाही. कदाचित त्यांना वाटत असेल की ज्याप्रकारे मी चित्रपटांमध्ये दिसते, वास्तविक जीवनात देखील मी तशीच आहे. हिरोईन या हिंदी चित्रपटाच्या प्रतिमेमध्ये बसणे मला खूप त्रासदायक वाटते. मी अभिनेत्री नसून फक्त आणि फक्त एक मॉडेल आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार रियाने 2017 मध्ये छायाचित्रकार शिवम तिवारीशी छुप्या पद्धतीने लग्न केले. रियाने इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली. रियाच्या अचानक लग्नानंतर ती ग-र्भव-ती असल्याच्या बातम्या आल्या आणि याच कारणामुळे तिने लग्नाचा निर्णय घेतलयाचा खुलासा झाला. रियाने बॉलिवूडमध्ये जवळजवळ 30 चित्रपट केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.