आपल्या पतीला दुसऱ्या अभिनेत्री सोबत पाहून जेव्हा चालू शूटींग मध्येच पोहोचली अभिनेत्री ट्विंकल….

अभिनेता अक्षय कुमारचे नाव आपल्या काळातील अनेक बड्या अभिनेत्रींशी संबंधित होते. यामध्ये रवीना टंडन, शिल्पा शेट्टी आणि प्रियंका चोपडा सारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे.

एका वेळी अक्षय कुमार आणि प्रियांकाची जोडी मोठ्या पडद्यावर खूप पसंत केली जात होती. दोघांनी ‘मुझसे शादी करोगी’, ‘वक्त’, ‘अंदाज’ आणि ‘ऐताराज’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.

एकत्र काम करताना अक्षय आणि प्रियांका अगदी जवळ आले होते आणि त्यांच्या रोमान्सची चर्चा होत असे. ही बातमी ट्विंकलपर्यंतही पोहोचली होती.मीडिया रिपोर्टनुसार ट्विंकलने अक्षयला समजावून सांगितले की तू प्रियंकापासून दूर राहिलास तर बरे होईल. मात्र, पत्नी ट्विंकलच्या या बोलण्यावर अक्षयने काही खास लक्ष दिलं नाही.

यादरम्यान ट्विंकल आणि प्रियंका यांच्यात फोनवर भांडण झाले. अशा परिस्थितीत ट्विंकल स्वत: प्रियंकाला समजावण्यासाठी ‘वक्त चित्रपटाच्या सेटवर गेेली होती. येथे तिला प्रियांका मिळाली नाही परंतु अक्षयबरोबर तिचे भांडण झाले होते. त्यानंतर अक्षय कुमारने पुन्हा कधीही प्रियांकाबरोबर कोणत्याही चित्रपटात काम केले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.