बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींमध्ये जया प्रदा 59 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे झाला. दक्षिण तसेच बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारी जया प्रदा तीच्या आयुष्याच्या रहस्यांमध्ये परिपूर्ण आहे. एका मुलाखती दरम्याान तिने स्वत: च्या आयुष्यातील अनेक रहस्ये उघड केली आहेत. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारी जया आताा चित्रपटात क्वचितच दिसते.
तिने बर्याच काळापासून अभिनयापासून अंतर ठेवले आहे आणि राजकारणात सक्रिय झाली आहे. जेव्हा ती 14 वर्षांची होती, तेव्हा शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात तिचे नृत्य सादर झाल्यावर एका दिग्दर्शकाने तिला तेलगू चित्रपटात नृत्य नंबर ची ऑफर दिली होती. चित्रपटात 3-4 मिनिटांचा डान्स नंबर करण्यासाठी तिला दहा रुपये मिळाले होते. जया डान्स नंबरमुळे लोकप्रिय झाली आणि तिला बर्याच चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या.
वयाच्या 17 व्या वर्षी तीची गणना दक्षिणच्या हिट अभिनेत्रींमध्ये केली जात असे. 1979 मध्ये तिने ‘सरगम’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 80 च्या दशकात जया प्रदाची गणना बॉलिवूडच्या सर्वोच्च अभिनेत्रींमध्ये होऊ लागली. प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्माता तिला त्याच्या चित्रपटात कास्ट करण्यासाठी तयार असायचे.
तिच्या आयुष्यात एक वेळ असाही आली होती की, तिच्या घरात इनकम टैक्स ची रेड पडली होती. हा तीच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा होता. रेड पडल्यानंतर तिच्या कारकिर्दीचा आलेखही हळू हळू खाली येऊ लागला. हा तो काळ होता जेव्हा निर्माता श्रीकांत नाहाटा ने तिचे समर्थन केलेे होते. यावेळी त्यानें जयाला खूप मदत केली होती.
जया प्रदा आणि श्रीकांत नाहाटा हळूहळू चांगले मित्र बनले. आणि ते दोघे एकमेकांच्या जवळ आले. दोघांनाही लग्न करायचं होतं, पण सर्वात मोठी अडचण अशी होती की नाहाटा आधीपासूनच विवाहित होता आणि तीन मुलांचा पिता होता.जया नाहाटाच्या प्रेमात वेडी झाली होती. श्रीकांत विवाहित आहे, याची तिला काहीच हरकत नव्हती.बी-टाऊनमधेही त्यांच्या अफेअरच्या बातम्याही चर्चेचा विषय ठरल्या होत्या.
अखेर जया आणि श्रीकांतने लग्न करण्याचा निर्णय घेतला. श्रीकांतने 1986 मध्ये जया प्रदाशी पहिल्या पत्नीला घ”टस्फो’ट न देता लग्न केले होते. ही बातमी सर्वांसाठी धक्कादायक होती. इतकेच नाही तर श्रीकांतच्या पहिल्या पत्नीनेही या लग्नाला कधीही विरोध केला नाही.