‘धमाल’ या चित्रपटात पोट धरून हसवणाऱ्या या अभिनेत्याचा मुलगा आहे हा प्रसिद्ध अभिनेता!!

चित्रपटसृष्टीत विनोदकार म्हणून ओळखल्या जाणार्‍या अभिनेता जावेद जाफरी चा नुकताच वाढदिवस झाला आहे. जावेद आता 57 वर्षांचा झाला आहे. तो केवळ अभिनेता आणि विनोदी कलाकारच नाही तर एक उत्तम नर्तक देखील आहे. गायक, नृत्यदिग्दर्शक, व्हीजे आणि जाहिरात निर्माता म्हणूनही त्याने ठसा उमटविला आहे. जावेदने ‘मेरी जंग’ चित्रपटा द्वारे बॉलीवूड मधे प्रवेश केला आहे. हा चित्रपट 1985 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जावेदची नकारात्मक भूमिका होती.या भूमिकेचा तीव्र परिणाम झाला आणि सर्वांनी त्याचे कौतुक केले. यानंतर त्याने अनेक हिट चित्रपट दिले. तो ‘सलाम नमस्ते’, ‘ता रा रम पम’, ‘फायर’, ‘अर्थ’ आणि ‘ब्लॉकबस्टर’ ‘3 इडियट’ मध्ये दिसला.

जावेद जाफरीचे वडील जगदीप जाफरी, हे एक प्रसिद्ध विनोदकार होते. असे असूनही जावेदनी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यासाठी आपल्या वडिलांचे नाव आणि प्रभाव कधी वापरला नाही. जावेद जाफरी ‘तहलका’, ‘ओ डार्लिंग ये है भारत’, ‘अर्थ’, ‘डबल धमाल’, ‘जजंत्रम ममंतरम’, ‘सलाम नमस्ते’, ‘ता रा रम पम’, ‘धमाल’, ‘सिंग इज किंग’, ‘3 इडियट्स’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. तो बर्‍याच चित्रपटांमध्ये साइड रोलमध्ये होता किंवा काही मल्टीस्टारर चित्रपटांमध्ये दिसला. सरळ शब्दांत सांगायचे तर तो चित्रपटसृष्टीत मुख्य लीड आणि सुपरस्टार असलेली एखादी प्रतिमा तयार करण्यात तो अपयशी ठरला.

त्याच्या वाढदिवसाच्या या खास प्रसंगी त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगण्यात येणार आहेत. जावेद जाफरी चा जन्म डिसेंबर 4,1963 रोजी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाला.जावेदच्या वडिलांचे नाव जगदीप जाफरी होते. तो त्याच्या काळात बर्‍यापैकी लोकप्रिय विनोदकार होता. तथापि जावेदने कधीही आपल्या वडिलांच्या नावाचा अवलंब केला नाही.

बातमीनुसार जावेदचे वडील जगदीपचे तीन लग्न झाले होते. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव नसीम बेगम होते, दुसर्या पत्नीचे नाव सुघरा बेगम आणि तिसर्‍या पत्नीचे नाव नाझिमा आहे. त्याला 6 मुले आहेत. हुसेन जाफरी, शकीरा शफी आणि सुरैया जाफरी अशी पहिली पत्नी नसीम बेगम कडून तीन मुले झाली. जावेदचे वडील जगदीपची दुसरी पत्नी सुगरा बेगम ना जगदीप कडून दोन मुले होते. थोरले जावेद जाफरी आणि धाकटे नावेद जाफरी. जावेद आणि नावेद ही दोन्ही चित्रपटसृष्टीत नावाजलेली नावे आहेत. जगदीपच्या तिसर्या पत्नीचे नाव नजीमा आहे तिच्या कडून जावेद ला मुस्कान नावाची एक मुलगी आहे.

1996 मध्ये टीव्हीवर ‘बूगी वूगी’ हा डान्स रिअॅलिटी शो सुरू करण्यात आला होता, त्यात जावेद जाफरी आपला भाऊ नावेद च्यासमवेत न्यायाधीशांच्या भूमिकेत दिसला होता. 90 च्या दशकात ‘बूगी वूगी’ हा एक अतिशय लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो होता.जावेदचे दोन विवाह झाले होते. जावेद जाफरी ने केवळ चित्रपट क्षेत्रातच नव्हे तर राजकारणातही नशीब आजमावले आहे. 2014 ची लोकसभा निवडणूक त्यानी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर लढवली होती. त्यानी ही निवडणूक राजनाथ सिंहविरूद्ध लढली.

जावेदचे कुटुंब प्रसिद्धीपासून दूर आहे. जावेदला तीन मुले आहेत. अलाविया व्यतिरिक्त त्याला दोन मुले मिझान आणि अब्बास जाफरी आहेत. हबीबा जाफरी असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. जावेद यांचा मुलगा मिझान देखील चित्रपटसृष्टीत आहे. त्याने ‘मलाल’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे, अद्याप त्याच्या मुलीला सिनेमापासून दूर राहायचे आहे. बातमीनुसार जावेदची मुलगी अलाविया ला आतापर्यंत 15 मोठ्या ऑफर्स आल्या आहेत पण तिने सर्व नकार दिल्या आहेत. अलाविया फक्त 27 वर्षांची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.