टीव्हीची सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी आजकाल मुलांबरोबर सुट्टी घालत आहे. ती सध्या तीची मुलगी पलक तिवारी आणि मुलगा रेयांश बरोबर महाबळेश्वरमध्ये जंगलात फिरत आहे. आपल्या इंस्टाग्रामवर सुट्टीचा आनंद घेत असताना तिने अनेक फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्वेता व्हाईट शर्ट आणि जीन्समध्ये खूपच खुश दिसत आहे.
त्याचवेळी तीचीमुलगी पलक काळ्या कपड्यांमध्ये सुंदर दिसत आहे. 40 वर्षीय श्वेताचे आयुष्यात दोन विवाह केेले होते आणि ते दोन्हीही अयशस्वी ठरले आहेत. विभक्त झाल्यानंतर आता ती एकट्याने मुलांंचा सांभाळ करत आहे, आणि तीही जीवनाचा आनंद घेत आहे.
श्वेता तिवारी जेव्हा जेव्हा कामावरुन मोकळा वेळ घेते तेव्हा ती आपल्या मुलांसह सुट्टीवर घराबाहेर जाते. तसेच, आईप्रमाणेच श्वेताची मुलगी पलक लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
श्वेता शेवटचा टीव्ही शो ‘मेरी डेड की दुल्हन’मध्ये अभिनेता वरुण बडोला बरोबर दिसली होती. या दोघांची केमिस्ट्री चांगलीच पसंत केेली गेेली होती. तथापि, नोव्हेंबर 2020 मध्ये हा कार्यक्रम बंद करण्यात आला.
तसेच, श्वेता तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असते. बऱ्याच काळापासून तीचे अभिनव कोहलीशी तिचा मुलगा रेयांशवरुन भांडण सुरू आहे. अभिनवचा आरोप आहे की श्वेता आपल्या मुलाला भेटू देत नाही. यासाठी त्याने नोटीसही बजावली आहे.
श्वेताचे तीन वर्ष डेटिंगनंतर 2013 मध्ये अभिनेता अभिनव कोहलीसोबतचे दुसरे लग्न केले होते. अभिनव आणि श्वेताला मुलगा रेयांश आहे. श्वेताचे दुसरे लग्नही धोक्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार श्वेताने तिचा दुसरा पती अभिनव कोहलीविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. श्वेताने अभिनवविरोधात मुलगी पलक तिवारीवर हात उगारल्याबद्दल तक्रार दाखल केली होती.
श्वेताच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच चढउतार आले होते, ज्याचा तिने खुप सामना केला. तिने सेप्रेशन वरून अभिनव बद्दल सांगितले होते की ती आता घरात एकट्याने कमाई करणार आहे. म्हणून ती आता निराश होऊ शकत नाही.
एका एंटरटेनमेंट साइट शी बोलताना श्वेता म्हणाली होती की तिला पतीपासून विभक्त होण्याची चिंता करण्यासाठी वेळ नाही. तिचे वैयक्तिक जीवन एका कठीण टप्प्यातून जात आहे आणि त्याची काळजी तिला घ्यावीच लागेल. तिच्या खांद्यावर अनेक जबाबदार्या आहेत.