बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या कुटुंबीयांनी रविवारी एका छोट्या पाहुण्याचे स्वागत केले आहे. करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झाली आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. करिनाच्या दुसर्या मुलाच्या डिलीवरीची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे, पण करोडो चाहत्यांच्या मनात एक प्रश्न कायम आहे की तैमूर अली खानचा धाकटा भाऊ नेमका कोनासारखा दिसतो? तो त्याच्या आईसारखा आहे की त्याच्या वडीलासारखा दिसतो?
करीना कपूरचे वडील रणधीर कपूर ला विचारले असता त्याने टीओआयशी केलेल्या संभाषणात सांगितले की मला सर्व मुले सारखेच वाटतात. मात्र, जेव्हा त्याला पुन्हा तोच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की मला वाटते की तो काहीसा त्याचा भाऊ तैमूरसारखा दिसतो. जेव्हा रणधीरला विचारले गेले की तैमूर अली आपल्या भावाचे स्वागत करण्यासाठी कोणती तयारी करीत आहे, तेव्हा तो म्हणाला की, ‘मला वाटते की तो अजून खूपच लहान आहे’.
तथापि, रणधीर कपूरने असेही सांगितले की तैमूर आपल्या भावाचे स्वागत करण्यासाठी खूप उत्साही आहे. तो म्हणाला- की तो खूप खूष आहे. त्याला धाकटा भाऊ झाल्याचा आनंद आहे. सैफही खूप आनंदी आहे. आणि माझी मुलगीसुद्धा. मी त्या सर्वांना मनापासून आशीर्वाद देतो. आई आणि मुल दोघेही निरोगी आहेत, असेही रणधीर ने सांगितले आहे.
करीना कपूर खानने 20 डिसेंबर 2016 रोजी तिचा पहिला मुलगा तैमूर अली खानला जन्म दिला होता. करीना आणि सैफ यांनी आपल्या मुलाचे नाव तैमुर अली खान हेेनावव ठेवण्याची घोषणा केली होती, तेव्हा सोशल मीडियावर या नावाबद्दल बरीच खळबळ उडाली होती. विरोधक म्हणाले की, आक्रमणकर्ता राज्यकर्ता यांच्या नावावरून करीना आपल्या मुलाचे नाव कस ठेवेल. तथापि, नंतर जेव्हा तैमूरची छायाचित्रे आली तेव्हा लोक तैमूरच्या क्यूटनेसवर फिदा झाले.