प्रियंका चोप्रा ने बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपली प्रसिद्धी मिळवली आहे. लॉकडाउन आणि कोरोनाव्हायरसच्या काळात, ती घरी फ्री बसली आहे. अशा परिस्थितीत तिने तीचे बायोग्राफी ‘अनफिनिश्ड पूर्ण केले. पुस्तक तिने मंगळवारी लाँच केले आहे. या पुस्तकात प्रियांकाच्या शालेय जीवनाचा एक मजेदार किस्सा देखील आहे, जो आम्ही आज आपल्याला सांगणार आहोत.
प्रियंका लहान असताना आणि अमेरिकेत राहत असताना व शाळेत शिकत असताना ची ही गोष्ट आहे. त्या काळात प्रियंका अमेरिकेच्या इंडियानापोलिसमध्ये मावशी किरण जवळ राहत होती. तिच्या शाळेच्या काळात प्रियंकाचे प्रेम एका अमेरिकन मुलावर झाले होते. प्रियांकाने त्याचे नाव तिच्या पुस्तकात उघड केले नाही, म्हणून त्याला काल्पनिक नाव बॉब दिले आहे.
प्रियंका पुस्तकात सांगते की, ती दहावीत असताना तिचे प्रेम बॉब नावाच्या मुलावर झाले होते. बॉबच्या बोलण्याची आणि विनोद करण्याची शैली पाहून प्रियंका प्रभावित झाली होती. तिने त्याच्याबरोबर बराच वेळ घालवायला सुरुवात केली. व तीने बॉबशी लग्न करण्याचा प्लान ही केेला होता.
बॉबसोबत रोमान्स करणे प्रियंकाला खूप महाग पडले. तीची मावशी कुठेतरी बाहेर गेली होती. अशा परिस्थितीत प्रियंकाने बॉबला तिच्या घरी बोलावले. दोघे एकमेकांचे हात पकडुन सोफ्यावर बसून टीव्ही पहात होते. मग प्रियांकाची मावशी आली. तिच्या येण्याची वेळ नव्हती, पण ती अचानक आली होती. यामुळे प्रियंका अस्वस्थ झाली.
अभिनेत्रीने तिचा प्रियकर बॉब बेडरूमच्या कपाटात लपविला. ती म्हणाला की मी मावशीला काही सामान आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवते, मग तु बाहेर ये. मग मावशी आली की पण ती खूप रागात होती. ति काळजीपूर्वक प्रियंकाची खोली पाहू लागली. मग तीची नजर कपाटावर गेली.मग तिने प्रियांकाला कपाटात उघडण्यास सांगितले.
प्रियंका खूप घाबरली होती. पण मावशीच्या आग्रहामुळे तीला कपाट उघडावे लागले. या कपाटातून एक मुलगा बाहेर आला. यानंतर मावशीने प्रियांकाच्या आईला बोलावले आणि म्हणाली की ही मुलगी माझ्यासमोर खोटे बोलले असेे मला वाटत नव्हते, आणि एक मुलगा कपाटातून बाहेर आला आहे याची मी कल्पना करू शकत नाही.