2015 सालची सलमान खान स्टारर फिल्म बजरंगी भाईजानमध्ये मुन्नीच्या व्यक्तिरेखेमुळे वेगळी अशी ओळख निर्माण करणार्या बाल अभिनेत्री हर्षाली मल्होत्राला कोण ओळखत नाही. तीच्या क्यूटनेस चे खूप दिवाणे आहेत. इतकेच नाही तर बजरंगी भाईजान या चित्रपटात तीच्याद्वारे केलेल्या जबरदस्त अभिनयाचे सर्वांनीच कौतुकही केले आहे.
हर्षाली मल्होत्रा आता मोठी झाली असली तरी तिचा क्यूटनेस अजूनही खुप छान आहे. नुकतीच 13 वर्षीय हर्षालीला तिच्या आईबरोबर विमानतळावर स्पॉट केले होते. यावेळी ती बरीच ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसत होती. तीने ब्लू कलरची च्जीन्स आणि टॉपसह व्हाइट कलरचे जाकीट घातले होते,
विमानतळावर हर्षालीने तिच्या आईबरोबर पापाराझीसमोर पोज दिल्या आहेत. हर्षालीची अशी काही छायाचित्रे आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. काही चाहते हर्षालीचे कौतुक करत आहेत, तर काही चाहते असे आहेत जे एका कारणास्तव तीची चेष्टा करत आहेत. चला जाणून घेऊया, कारण काय आहे…
यामुळे हर्षालीची किरकिरी होत आहे.हर्षाली मल्होत्रा उर्फ मुन्नी चे प्रत्येक चित्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे. पण या व्हायरल फोटोत चाहते तीच्या चुका काढत आहेत. हर्षालीचा एअरपोर्ट लूक पाहून लोक तीची थट्टा करीत आहेत. एका चाहत्याने सांगितले की, मुन्नीच्या चेहऱ्यावर पावडर अधिक झाली आहे.
आणखी एक चाहता म्हणाला आहे की, मुन्नी चालताना पांड्स पावडरची जाहिरात करत आहे. याशिवाय दुसर्या एका यूजरने मुन्नीच्या या चित्रांवर भाष्य केले आहे की, मुन्नी तिच्या चेहऱ्यावर ब्लिच लाऊन बाहेर आली आहे का? तसेच एका यूजरने विनोदाने हा प्रश्न विचारला की मुन्नीने चुकून बिर्ला व्हाइट पुट्टी तर नाही लावली?
3 जून 2008 रोजी जन्मलेल्या हर्षाली मल्होत्राने वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी बजरंगी भाईजानमध्ये मुन्नीची भूमिका साकारली. या चित्रपटात अभिनय केल्याबद्दल तिला अनेक पुरस्कारही मिळाले आणि हर्षालीचे खूप कौतुक झाले. हर्षाली सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आसते आणि सतत तिच्या चाहत्यांसह फोटो शेअर करत असते.
गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त हर्षालीने तिच्या इंस्टा अकाउंटवरून काही छायाचित्रे शेअर केली आणि चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे ही चित्रे इंटरनेटवर खूप व्हायरल झाली.