केवळ १० वर्षांनीच मोठी आहे अभिनेता अक्षयची सासू; पाहा सासुशी कसं आहे नातं..

उत्तम अभिनय आणि ऍक्शन सीनमुळे गेल्या ३ दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. प्रोफेशनल लाइफसोबतच अक्षयची पर्सनल लाइफदेखील तितकीच चर्चेत येत असते. सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती म्हणजे अक्षय आणि त्याच्या सासूच्या वयामधील अंतराची.

अक्षय आणि त्याची सासू म्हणजेच अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यामध्ये केवळ १० वर्षांचंच अंतर आहे. डिंपल कपाडिया यांचा जन्म १९५३ सालचा असून अक्षय कुमारचा जन्म १९६३ मध्ये झाला आहे. २००१ मध्ये अक्षय कुमारने अभिनेता राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांची लेक ट्विंकल खन्ना हिच्यासोबत लग्नगाठ बांधली.

विशेष म्हणजे अक्षय कुमारचं त्याच्या सासरच्या मंडळींसोबत चांगली बॉण्डींग आहे. अक्षय आणि डिंपल कपाडिया यांच्यात सासू व जावई हे नातं असण्यासोबतच ते एकमेकांचे चांगले मित्रदेखील आहेत. अनेकदा या दोघांमधील निखळ मैत्री पाहायला मिळते.

डिंपल कपाडिया १६ वर्षांच्या असताना त्यांनी १९७३ मध्ये राजेश खन्नासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर वर्षभरानंतर ट्विंकलचा जन्म झाला. १९८३ मध्ये डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सध्या डिंपल या अक्षय आणि ट्विंकल यांच्यासोबतच राहतात असं सांगण्यात येतं.

Leave a Reply

Your email address will not be published.