असे म्हणतात की काळानुसार माणसामध्ये बदल होत जातात. शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्याने आपणास चांगले आरोग्य मिळते. आपल्याला फक्त एक शरीर मिळते, म्हणून याची काळजी घेणे महत्वाचे आहे. परंतु आपल्या शरीरावर व त्याच्या आकारावर नियंत्रण ठेवण आपल्या हातात आहे. अशा परिस्थितीत लोक नैराश्यामुळे, आळशीपणामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपल्या शरीराची योग्य काळजी घेत नाहीत आणि वयोमानानुसार मोठ्या प्रमाणात त्यांच्यात बदल होत जातो.
जर चित्रपट अभिनेत्रींबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यावर कायमच चांगले दिसण्यासाठी खूप दबाव असतो. एखाद्या अभिनेत्रीला तिच्या फिगरची काळजी घ्यावी लागते. म्हणजेच तीच दिसणं अगदी उत्तमच असायला पाहिजे. या कारणास्तव आजकाल बऱ्याच अभिनेत्री वाढत्या वयातही स्वत:ला खूप चांगले मेंटेन ठेवतात.
आज आम्ही आपल्याला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिच्या पहिल्या आणि आताच्या दिसण्यात खूप फरक आहे. खरं तर आम्ही बोलत आहोत दक्षिण फिल्म इंडस्ट्रीच्या प्रसिद्ध अभिनेत्री नमिताबद्दल…
नमिता ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध आहे. सध्या ती तामिळनाडूमधील भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य आहे.
तिला तिच्या काळातील सर्वात सुंदर आणि हॉ’ट अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. जेव्हा तिचे चित्रपट सिनेमा हॉलमध्ये दाखवले जात असत आणि तिच पडद्यावर येणं होत असे तेव्हा इतक्या शिट्ट्या वाजायच्या की कोणी त्या थांबवायचे नाव घेत नसत.
१९८१ मध्ये जन्मलेली नमिता आता ३७ वर्षांची झाली आहे. २०१७ मध्ये तिने तमिळ अभिनेता-निर्माता वीरेंद्र चौधरीशी लग्न केले. २०१६ मध्ये एका मित्राच्या माध्यमातून त्यांची एकमेकांशी भेट झाली. वीरेंद्रने तिला अत्यंत रोमँटिक मार्गाने कॅडललाईट जेवणावेळी कसे प्रपोज केले होते, हे नमिताने एका मुलाखतीत सांगितले होते.
पण अलीकडेच तिचा असा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला की त्यात तिला अजिबात ओळखता येत नाही आहे. या व्हिडिओमध्ये नमिता बरीच जाड झाल्याचे दिसत आहे. यासोबतच तिच्या चेहऱ्यावरही डाग आलेले दिसत आहेत. तिचे चाहते हा व्हिडिओ पाहून तिला ओळखु शकत नाही आहेत. एकेकाळी आपल्या सौंदर्याने आग लावणारी ही अभिनेत्री तिची आता अशी अवस्था झाली आहे यावर कोणालाही विश्वास बसत नाही आहे.
नमिताच्या आताच्या या अवस्थेचे कारण काय आहे हे अद्याप माहित नाही. पण लोकं सोशल मीडियावर अंदाज लावू लागलेत की उदासीनतेमुळे तर नमिताचं असं झालं नसेल ना!! या बातमीमध्ये किती तथ्य आहे याविषयी आता काहीही बोलता येणार नाही. तसे पुरावेही नाहीत. सध्या या चित्रांद्वारे आपल्याला पूर्वीच्या आणि आत्ताच्या नमीताच्या स्थितीची अचूक कल्पना येऊ शकते.
ही चित्रे पाहिल्यानंतर आपल्याला हा धडा देखील मिळतो की एखाद्या व्यक्तीने आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी. अन्यथा नंतर आपणास आपल्या आरोग्याशी संबंधित काही आजारही होऊ शकतात. तेव्हा योग्य शारीरिक काळजी घेणं, आपल्याला वाढत्या शरीरामुळे होणाऱ्या हानी पासून वाचवू शकते तसेच वाढत्या वयात त्याचे फायदेही होतात.