ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन बॉलीवूडमधील प्रसिद्ध फेमस मैरिड कपल पैकी एक आहेत. त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. विशेषत: या दोघांची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 2007 मध्ये जोडप्याने लग्न केले होते. तेव्हापासून या दोघांमध्येे प्रेम जसे आधी होते तसेच आताही आहे. या दोघांमधील चांगले बॉन्डिंग पब्लिक प्लेस वर बर्याच वेळा पाहायला मिळते.
व्हिडिओमध्ये अभिषेक स्टेजवरील एका अवॉर्ड शोमध्ये एकट्याने नाचत आहे. त्याचवेळी ऐश्वर्या प्रेक्षकांच्या मधोमध बसून तीच्या नवऱ्याचा डान्स पाहत आहे. पण त्यानंतर अभिषेक नाचताना रोमँटिक मूडमध्ये येतो. व स्टेजवरुन खाली उतरतो आणि ऐश्वर्याचा हात धरतो आणि तिलाही स्टेजवर घेऊन जातो. यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र एक उत्तम डान्स सादर करतात.
हा थ्रोबॅक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर एका चाहत्याने पेजवर शेअर केला आहे. त्याला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. ऐश-अभिषेक चा हा व्हिडिओ च्चाहत्यांना खूप आवडला आहे. ज्याने हा व्हिडिओ पाहिला त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य उमटलेे आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडूनही चांगल्या टिप्पण्या आल्या आहेत. उदाहरणार्थ, एका वापरकर्त्याने लिहिले की ‘नाइस कपल’, तर दुसर्याने म्हटले आहे की ‘प्रेम असावे तर असे नाहीतर नाही.
ऐश्वर्या अभिषेकची जोडी अप्रतिम आहे यात काही शंका नाही. महत्त्वाचे म्हणजे ऐश्वर्या अभिषेकपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. परंतु असे असूनही, या दोघांमधील केमिस्ट्री आश्चर्यकारक आहे. या लग्नापासून त्यांना 9 वर्षाची मुलगी आराध्या बच्चन देखील आहे. सध्या, ते सर्व आनंदी कुटुंबासारखे एकत्र राहतात.
कामाबद्दल बोलताना ऐश्वर्या राय शेवटच्या वेळी ‘फन्ने खान’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास पराक्रम दाखवू शकला नाही. ऐश्वर्या लवकरच अनुराग कश्यपच्या गुलाब जामुन फिल्म मध्ये दिसणार आहे. त्याचवेळी, तिचा नवरा अभिषेक बच्चन याच्याविषयी बोलताना, तो ‘लुडो’ चित्रपटात दिसला. आता तो त्याच्या आगामी , दस्वी द बिग बुल आणि बॉब बिस्वास या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.